ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरून आव्हाड, फडणवीसांमध्ये ट्विटर वॉर

author img

By

Published : Apr 3, 2021, 10:22 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. मात्र त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका करत, इतर देशांनी कशाप्रकारे नागरिकांना कोरोना काळात सुविधा दिल्या याचा पाढा वाचून दाखवला. दरम्यान फडणवीस यांच्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये आज दिवसभर ट्विटर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळालं.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. मात्र त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका करत, इतर देशांनी कशाप्रकारे नागरिकांना कोरोना काळात सुविधा दिल्या याचा पाढा वाचून दाखवला. दरम्यान फडणवीस यांच्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये आज दिवसभर ट्विटर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळालं.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

कोरोना काळात केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र या पॅकेजमधला एकही रुपया महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी वापरला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. या पॅकेजमधून महाराष्ट्राच्या वाट्याला दहा हजार सातशे पंधरा कोटी एवढीच रक्कम आली असून, केंद्राच्या पॅकेजमधून केवळ 0.5 टक्के एवढा निधी मिळाला अशी टीका आव्हाड यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

ट्विटरच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोना परिस्थिती त्यांनी जनतेसमोर मांडली. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिल्यास इतर देशाप्रमाणे आपल्यालाही लॉकडाऊन लावावा लागेल असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान यावरून फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. इतर देशांनी लॉकडाऊन काळात तेथील जनतेला आर्थिक मदत देखील केली होती, असं फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीस यांच्या टीकेला त्यानंतर आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. ती मदत केंद्राने जनतेला दिली होती. इथे केंद्र राज्याच्याच वाट्याचे पैसे देत नाही, तर मदतीची काय अपेक्षा ठेवणार असे आव्हाड यांनी म्हटले होते. त्यानंतर पुन्हा फडणवीसांनी आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे असा टोला लगावला. महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे, की केंद्राने केलेल्या मदतीचा एकही रुपया सामान्य जनतेसपर्यंत पोहोचला नसल्याचाही आरोप यावेळी फडणवीसांनी केला आहे. आज दिवसभर फडणवीस आणि आव्हाड यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.