ETV Bharat / city

POCSO offence चिमुकल्यांच्या खासगी भागांना स्पर्श केला तरी POCSO गुन्हा होईल, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

author img

By

Published : Aug 25, 2022, 10:12 PM IST

बालकांच्या खासगी भागाला स्पर्श केला, तरी पोक्सो गुन्हा दाखल करता येईल असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका नराधमाला याप्रकरणी ट्रायल कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Mumbai high court
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई - ट्रायल कोर्टाने पाच वर्षाच्या बालिकेवर लैंगिक शोषण Child physical Abused केल्या प्रकरणात 5 वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात Mumbai high court धाव घेतली होती. मात्र आरोपीचा अर्ज फेटाळत उच्च न्यायालयाने लैंगिक हेतूने खासगी भागांना स्पर्श करणे हे लैंगिक अत्याचार Touching child's private Parts will be a POCSO offence Says Mumbai high court म्हणून समजले जाईल असे मत नोंदवले आहे. बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला यामुळे मोठा दणका बसला आहे.

लैंगिक हेतूने खासगी भागांना स्पर्श करणे गुन्हा पीडित व्यक्तीला दुखापत न झाल्याने लैंगिक Child physical Abuse अत्याचाराच्या प्रकरणात काही फरक पडणार नसल्याचे न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल यांनी सांगितले. लैंगिक हेतूने खासगी भागांना स्पर्श करणे देखील गुन्ह्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसे असल्याचे कायद्याचे कलम 7 लैंगिक अत्याचारात Touching child's private Parts will be a POCSO offence नमूद आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रात नमूद केलेल्या दुखापतीच्या अनुपस्थितीमुळे तिच्या प्रकरणात काही फरक पडणार नाही. POCSO कायद्याच्या कलम 8 सह कलम 7 मधील तरतुदी आहेत, असेही न्यायालयाने म्हटले. त्यामुळे 5 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार Child physical Abuse केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीने दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळून लावले आहे.

घराबाहेर खेळताना बालिकेला नेले एकांती पीडित अल्पवयीन बालिका तिच्या घराबाहेर खेळत होती. तेव्हा आरोपीने तिला सोबत नेले, तिचे डोळे बंद केले, तिच्या प्रायव्हेट पार्टला Child physical Abuse स्पर्श केला. पीडित मुलीने ही घटना तिच्या आईला सांगितल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर मुलीचे म्हणणे नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि POCSO कायद्याच्या कलम 8 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या गुन्ह्याप्रकरणी मुंबईतील विशेष POCSO न्यायालयाने आरोपीला 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

भांडणामुळे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले मुंबई उच्च न्यायालयामध्ये Mumbai high court या विरोधात आरोपीच्या वतीने शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी आरोपीच्या वतीने अॅडवोकेट सुशन म्हात्रे यांनी सांगितले, की आरोपी आणि पीडित मुलीचे वडील यांच्यात झालेल्या भांडणामुळे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. त्यांनी अधोरेखित केले, की एफआयआर घटनेच्या दोन दिवसांनंतर दाखल करण्यात आला आणि तक्रारदाराकडून विलंब स्पष्ट केला गेला नाही. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीत medical test कोणतीही जखम आढळली नाही. ज्यामुळे ही तक्रार संशयास्पद बनली आहे. त्यामुळे दोषसिद्धी बाजूला ठेवण्यासाठी म्हात्रे यांनी न्यायालयाला Mumbai high court विनंती केली.

शरीरावर कोणतीही जखम आढळली नाही, हा बचाव होत नाही न्यायालयाने Mumbai high court नमूद केले की मुलगी आणि तिच्या आईने या घटनेचे पुरेसे तपशीलवार वर्णन केले आहे. मुलगी खोटे बोलत असल्याचे दिसत नाही. या प्रकरणात पीडिता आणि तिच्या आईच्या डोळ्यांच्या पुराव्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे तक्रारदारांवर शंका घेण्याचे कारण नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने Mumbai high court व्यक्तीच्या शरीरावर कोणतीही जखम आढळली नाही, यावरुन आरोपीचा बचाव होऊ नाही. म्हणूनच आरोपीला दोषी ठरवण्याच्या ट्रायल कोर्टाच्या trial court आदेशात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने Mumbai high court नकार दिला.

हेही वाचा Sonali Phogat death case सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी दोन सहकारी पोलिसांच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.