ETV Bharat / city

दिवसभरात राज्यात ८ हजार १५१ नवीन कोरोना रुग्ण; २१३ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Oct 20, 2020, 9:49 PM IST

राज्यात आज ७ हजार ४२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १३ लाख ९२ हजार ३०८ वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

maharashtra corona
कोरोना

मुंबई - दिवसभरात राज्यात ८ हजार १५१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ७४ हजार २६५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज २१३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - मुंबईतील लोकल प्रवासासाठी महिलांना उद्यापासून मुभा.. रेल्वेमंत्री गोयल यांची घोषणा

राज्यात आज ७ हजार ४२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १३ लाख ९२ हजार ३०८ वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८२,५१,२३४ नमुन्यांपैकी १६,०९,५१६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५१ टक्के) आले आहेत. राज्यात २४,३४,६८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३,४८८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ४२,४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

हेही वाचा - Etv Bharat Exclusive : हा तर निर्लज्जतेचा कळस..! कमलनाथांवर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.