ETV Bharat / city

Tipu Sultan Name Controversy in Mumbai : मुंबईत टिपू सुलतान यांच्या नावावरून राजकारण तापले!

author img

By

Published : Jan 25, 2022, 5:32 PM IST

Updated : Jan 25, 2022, 7:03 PM IST

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपने टिपू सुलतान यांच्या नावावरून एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवला( Malad ground controversy ) आहे. गेल्या वर्षी मुंबईतील गोवंडी परिसरात एका बागेला टिपू सुलतान असे नाव देण्यावरून वाद झाला ( Tipu Sultan ground ) होता. आता खेळाच्या मैदानाबाबतही असाच वाद सुरू झाला आहे.

मुंबईत टिपू सुलतानच्या नावावरून राजकारण तापले
मुंबईत टिपू सुलतानच्या नावावरून राजकारण तापले

मुंबई - मालाड येथील एका क्रीडांगणाच्या नावावरून ( Malad ground controversy ) वाद सुरू झाला आहे. टिपू सुलतान यांच्या नावावर ठेवण्यात येणाऱ्या या मैदानाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी मुंबईतील मालाड येथे काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार ( Mumbai Guardian minister Aslam Shaikh ) आहे. या उद्घाटनापूर्वी भाजपसह विश्व हिंदू परिषदेने या उद्घाटनाला आक्षेप घेतला आहे.

विहिंपचे नेते श्रीराज नायर यांनी ( VHP Leader Tipu Sultan ground ) टिपू सुलतान मैदानाच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुंबईची शांतता बिघडविण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले आहे. ते टाळता आले असते. महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे. हे नाव देणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबईत टिपू सुलतानच्या नावावरून राजकारण तापले

हेही वाचा-National Award For Children : नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटीलचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव

भाजपची शिवसेनेवर टीका
रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. अशातच भाजपला टिपू सुलतान यांच्या नावाने शिवसेनेवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. 24 तासांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची भाषा केली. मुंबईतील मैदानाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून टिपू सुलतान यांचे नाव देण्यात येत आहे, असे विधान भाजप नेते राम कदम यांनी ट्विटरवर केले आहे. ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली त्यांचे मंत्री टिपू सुलतान मैदानाचे उद्घाटन करणार आहेत.

हेही वाचा-SRPF jawan suicide : मंत्रालयाच्या मुख्य गेटवरील एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही टिपू सुलतान नावाला विरोध

याआधीही महाराष्ट्रात शिवसेना-भाजपने टिपू सुलतान यांच्या नावावरून एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षी मुंबईतील गोवंडी परिसरात एका बागेला टिपू सुलतान असे नाव देण्यावरून वाद झाला होता. आता खेळाच्या मैदानाबाबतही असाच वाद सुरू झाला आहे. शिवसेनेचे काही कार्यकर्तेही टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा-National Tourism Day 2022 : जगात एकमेव असणारी वेरूळ लेणी घडवते तीन धर्मांचे दर्शन

Last Updated : Jan 25, 2022, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.