ETV Bharat / city

ऑनलाईन गेम’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुटले, भाजप आमदार राम कदम यांचा राज कुंद्रावर गंभीर आरोप

author img

By

Published : Jul 30, 2021, 5:02 PM IST

Updated : Jul 30, 2021, 5:14 PM IST

पोर्न फिल्म प्रकरणी सध्या अटकेत असेल्या बिजनेसमन राज कुंद्रावर भाजपचे आमदार राम कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने ऑनलाईन गेम GOD'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणुक केली आहे. यामध्ये अनेक गोरगरिबांना लुटल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑनलाईन गेम’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुटले, भाजप आमदार राम कदम यांचा राज कुंद्रावर गंभीर आरोप
ऑनलाईन गेम’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुटले, भाजप आमदार राम कदम यांचा राज कुंद्रावर गंभीर आरोप

मुंबई - भाजप प्रवक्ते आमदार राम कदम यांनी बिजनेसमन राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. राज कुंद्रा सध्या पॉर्न फिल्म प्रकरणात अटक आहे. राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची लुट केली आहे. तसेच, गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उकळले आणि वितरणाच्या नावाखाली गरिबांना लुटले असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

'शिल्पा शेट्टीच्या गुणांचा आम्ही सन्मान करतो'

राज कुंद्राने या गेमच्या प्रचारासाठी पत्नी शिल्पा शेट्टीचे नाव व फोटोंचा वापर केला होता. राज कुंद्राने ऑनलाईन गेम GOD च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणुक केली आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या गुणांचा आम्ही सन्मान करतो, मात्र, या गेमच्या प्रचारासाठी शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्याचा देखील वापर केला गेला. राज कुंद्राची विआन इंडस्ट्री नावाची कंपनी आहे, ज्यामध्ये ते संचालक आहेत. विआन कंपनीचा GOD (Game of Dots) नावचा एक खेळ आहे. असेही कदम म्हणाले आहेत.

'गरिबांना लुटण्याचा अधिकार राज कुंद्राला कुणी दिला?'

ऑनलाईन गेमच्या नावाखाली कुणाकडून ३० लाख तर कुणाकडून १५ ते २० लाख रुपये घेतले गेले आहेत. गेमच्या डिस्ट्रीब्यूशनच्या नावाखाली लोकांना फसवले गेले व त्यांचे पैसे लुटले. काही जणांना डिस्ट्रिब्यूटरशिप दिली, तर काही जणांना तसेच ठेवले. दरम्यान, काहींना तत्काळ लक्षात आले की ही फसवेगिरी आहे. अशाप्रकारे गरिबांना लुटण्याचा अधिकार राज कुंद्राला कुणी दिला? असा सवालही राम कदम यांनी केला आहे. तसेच, राम कदम यांनी यामध्ये फसवल्या गेलेले लोक जेव्हा राज कुंद्राच्या ऑफिसवर पैसे मागण्यासाठी गेले तेव्हा त्यांना बाउंन्सने मारहाण केली असल्याचेही राम कदम म्हणाले आहेत.

राज कुंद्रावरील अडचणींत दिवसेंदिवस वाढ

राज कुंद्रा संध्या पोर्न फिल्म प्रकरणी अटक आहे. या प्रकरणात त्याच्यावर वारंवार आरोपांत वाढ होत गेलेली आहे. दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी एका वेगळ्याच विषयाला तोंड फोडले आहे. यामध्ये राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचेही नाव आहे. त्यामुळे राज कुंद्रावरील अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Last Updated : Jul 30, 2021, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.