ETV Bharat / city

भ्रष्टाचार प्रकरणातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करा - किरीट सोमैय्यांची राज्यपालांकडे मागणी

author img

By

Published : Oct 2, 2021, 1:43 AM IST

राज्यपालांना महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या आरोपांबाबतची माहिती दिल्याचे किरीट सोमैय्या यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्याचे पोलीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली काम करत आहेत. आपल्याला कोल्हापूरला जाण्यापासून पोलिसांनी बेकायदेशीररित्या रोखल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर केला आहे.

किरीट सोमैय्या
किरीट सोमैय्या

मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या हे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर एकामागून एक आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख परिवहन मंत्री अनिल परब खासदार भावना गवळी यांच्यावर चौकशीच्या फेऱ्यातदेखील सुरू झाल्या आहेत. या सर्व नेत्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमैय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

भ्रष्टाचार प्रकरणातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करा

राज्यपालांना महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या आरोपांबाबतची माहिती दिल्याचे किरीट सोमैय्या यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्याचे पोलीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली काम करत आहेत. आपल्याला कोल्हापूरला जाण्यापासून पोलिसांनी बेकायदेशीररित्या रोखल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर केला आहे.

अब्रुनुकसानीचे दावे न्यायालयात टिकणार नाहीत-

आघाडी सरकारच्या नेत्यांवर केलेल्या आरोपानंतर अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांनी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. हे दावे न्यायालयात टिकणार नाहीत. उलट महाविकास आघाडी सरकारला त्यांच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची भूमिका न्यायालयामध्ये स्पष्ट करावी लागेल, असे मत सोमैय्या यांनी व्यक्त केले.

हेही वाचा-25 वर्ष मेहनत करून राजकारणात आलो, सोमैयांचे आरोप खोटे - हसन मुश्रीफ

...म्हणून आघाडी सरकारचे मंत्री पडतात आजारी
2019 च्या विधानसभा निवडणुकापूर्वीदेखील सोमैय्या यांनी अशा प्रकारचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर केले होते. मात्र, आरोप केलेल्या नेत्यांपैकी आता बरेच नेते भाजपच्या गोटामध्ये दिसत आहेत. मात्र, आपण केवळ आरोप करत नाहीत. आपल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. त्यामुळे आरोपानंतर आघाडी सरकारचे नेते आणि आजारी पडतात किंवा फरार होत असल्याची मिश्किल टीका किरीट सोमैय्या यांनी आघाडीच्या मंत्र्यांवर केली आहे.

संबंधित बातमी वाचा-हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपप्रकरणी सोमैया आज राज्यपालांना भेटणार

मुश्रीफ यांनी १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केले आहेत. मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमैय्या यांनी तब्बल 2700 पानांचे पुरावे ईडीला सादर केल्याचा दावा सोमैय्या यांनी केला होता. मुश्रीफ यांनी याविरोधात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

अनिल परब यांच्यावर काय आहे आरोप ?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात चौकशी करण्यासाठी अनिल परब यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल परब यांना 20 कोटी रूपये मिळाल्याचा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला होता. त्यासंबंधी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.