ETV Bharat / city

Devendra Fadnavis लोकेशन कळण्याची यंत्रणा बदलावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात निवेदन

author img

By

Published : Aug 22, 2022, 8:19 PM IST

काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड MLA Varsha Gaikwad यांनी मेटे यांच्या अपघाताचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देतांना, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे Vinayak Mete, यांच्या चालकाचा अंदाज चुकल्याने अपघात झाला. त्यात लोकेशन त्वरित न कळल्याने मदत पोचायला उशीर झाला. तेव्हा लोकेशन कळण्याची यंत्रणा बदलावी, असा मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी विधानसभेत Statement by Deputy Chief Minister मांडला.

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड MLA Varsha Gaikwad यांनी मेटे यांच्या अपघाताचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देतांना, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे Vinayak Mete, यांच्या चालकाचा अंदाज चुकल्याने अपघात झाला. त्यात लोकेशन त्वरित न कळल्याने मदत पोचायला उशीर झाला. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. लोकेशन कळण्याची यंत्रणा बदलावी, असाही मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी विधानसभेत Statement by Deputy Chief Minister मांडला.



शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू विषयी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केले. नेमका अपघात कसा घडला, याची सविस्तर माहिती त्यांनी सभागृहाला दिली. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाने एकनाथ कदम यांना ओव्हरटेक करतांना अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतांना ही घटना घडली. अपघात झाल्यानंतर नेत्यांच्या चालकांनी फोन केल्यानंतर वेळेत मदत पोहोचली नाही. चालकाने सांगितल्याप्रमाणे, नवीमुंबई आणि रायगड पोलीस रस्त्याचा शोध घेत होते. परंतु, अपघाताचे लोकेशन समजू शकले नाही, ही यंत्रणा बदलण्याची गरज आहे, असा मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. या प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास सुरू आहे. शासकीय मदत मिळण्यास काही उणीव राहीली का, याचाही स्वतंत्र तपास केला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच सर्व सदस्यांनी रात्रीचा प्रवास टाळावा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे मुंबईला जात होते. दरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यामध्ये त्यांचे निधन झाले.

हेही वाचा Amit Shah Met Ramoji Rao रामोजी राव लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटीनंतर प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.