ETV Bharat / city

BJP 12 MLA Suspended Issue : भाजपाच्या १२ निलंबित आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १८ जानेवारीला सुनावणी

author img

By

Published : Jan 11, 2022, 6:32 PM IST

Updated : Jan 11, 2022, 6:40 PM IST

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

भाजपाच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित ( 12 BJP MLAs Suspended for 1 Year ) करण्यात आले होते. यावर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका ( Petition To The Supreme Court ) दाखल केली होती. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १८ जानेवारीला ( Hearing January 18 ) होणार आहे.

मुंबई - मागच्या पावसाळी अधिवेशनात ( Rainy Session ) विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव ( Assembly Table Speaker Bhaskar Jadhav ) यांच्याबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित ( 12 BJP MLAs Suspended for 1 Year ) करण्यात आले होते. यावर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका ( Petition To The Supreme Court ) दाखल केली होती. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १८ जानेवारीला ( Hearing January 18 ) होणार आहे. याबद्दल बोलतांना आमदार आशिष शेलार ( MLA Ashish Shelar ) म्हणाले की, न्यायपालिकेवर आमचा पूर्ण विश्वास असून आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय भेटेल, असा आशावाद त्यांनी दाखवला आहे.

प्रतिक्रिया देतांना आमदार आशिष शेलार
  • पावसाळी अधिवेशनात झाले होते निलंबन

मागच्या वर्षी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपeच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मागच्या महिन्यात १४ डिसेंबरला सुनावणी होऊन निलंबन कायम ठेवत पुढील सुनावणी आज ठेवण्यात आली होती. आज ५ तास या सुनावणीवर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. या दरम्यान आमदारांवर झालेल्या कारवाईवर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. आता ही सुनावणी १८ जानेवारीला पुन्हा ठेवण्यात आली आहे.

  • 'हे' आमदार झालेत निलंबित?

आशिष शेलार, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, कीर्तिकुमार भांगडिया यांचे निलंबन करण्यात आले होते.

हेही वाचा - Sharad Pawar on Assembly Election : राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार, यूपीत सपाशी युती

Last Updated :Jan 11, 2022, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.