ETV Bharat / city

Sunil Raut on Sanjay Raut : खोटे प्रकरण तयार करून संजय राऊतांना अटक, हे सर्व भाजपचे कारस्थान - सुनील राऊत यांचा आरोप

author img

By

Published : Aug 1, 2022, 7:37 AM IST

पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. सकाळी 7 ते सध्याकाळी 4 पर्यंत संजय राऊत यांची ( Sanjay Raut arrest by ED ) त्यांच्या घरी चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशी नंतर त्यांना ईडीने ( Patra chawl scam and sanjay raut ) अटक केल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली.

Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED
संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई

मुंबई - पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. सकाळी 7 ते सध्याकाळी 4 पर्यंत संजय राऊत यांची त्यांच्या घरी चौकशी ( Sanjay Raut arrest by ED ) झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशी नंतर त्यांना ईडीने ( Patra chawl scam and sanjay raut ) अटक केल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली. भाजप संजय राऊत यांना घाबरत असून म्हणून त्यांची अटक करण्यात आल्याचे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज न्यायालयासमोर संजय राऊत यांना हजर करण्यात ( ED action on sanjay raut regarding patra chawl scam ) येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

माहिती देताना सुनील राऊत

हेही वाचा - Gold Silver Rates : सोने स्थिर, तर चांदी झाली 400 रुपयांनी महाग; जाणून घ्या सोने-चांदीचे दर

भाजप संजय राऊत यांना घाबरते - संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. भाजप संजय राऊत यांना घाबरते, म्हणून त्यांची अटक करण्यात आली. संजय राऊत यांच्या अटकेप्रकरणी आम्हाला कुठलीही कागदपत्रे देण्यात आलेली नाही. त्यांच्याविरुद्ध कट रचण्यात आला आहे, असे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज सकाळी 11.30 वाजता संजय राऊत यांना न्यायालयात हजर केले जाईल, असा दावा सुनील राऊत यांनी काल केला.

संजय राऊत यांना ईडीकडून अटक - पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या घरी काल सकाळी 7 ते सध्याकाळी 4 वाजेपर्यंत चौकशी झाली. त्यानंतर ईडीने त्यांना कार्यालयात नेले व तेथे चौकशी केली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास राऊत यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या सुत्रांनी सांगितले. संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात शिवसैनिक घराबाहेर जमले होते. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. चौकशीदरम्यान संजय राऊत यांनी खिडकीतून समर्थकांकडे हातवारे देखील केले होते.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? - पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.

आक्षेप असणारा जमीन व्यवहार काय? - पत्रा चाळ परिसराचे मूळ क्षेत्रफळ 1,93,599 चौरस मीटर विकास करारनाम्यात 1,65,805 चौरस मीटर म्हणजे 27,794 चौरस मीटर कमी दाखविण्यात आले. म्हाडाच्या वाटय़ाला येणाऱ्या 50 टक्के म्हणजे 13,897 चौरस मीटर जागेचा विकासकाला फायदा करून दिल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता एस. डी. महाजन निलंबित झाले आहेत.

कंपनी दिवाळखोरीत - मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शनने युनियन बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने विकासकाविरुद्ध लवादाकडे दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अर्ज केला. त्यानुसार राष्ट्रीय कंपनी विधी लवादाने विकासकाला म्हणजेच या कंपनीला दिवाळखोर घोषित केलं.

9 जणांना विकला एफसआय आणि कमवले 901 कोटी - मे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्स'च्या नावाखाली हा सर्व घोटाळा झाला तेव्हा राजेश कुमार वाधवान, सारंग वाधवा आणि प्रवीण राऊत हे या कंपनीचे निर्देश होते. ही कंपनी आणि म्हाडादरम्यान झालेल्या करारामनुसार येथील 672 कुटुंबांना पुन:विकसित केलेले प्लॅट्स म्हाडाच्या माध्यमातून बांधून देणं अपेक्षित होतं. त्यानंतर उर्वरित जमीन ही विकासांना विकली जाणार होती. मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स च्या निर्देशकांनी म्हाडाची फसवणूक केली. त्यांनी या जागेचा एफएसआय 9 विकासकांना विकला. यामधून त्यांनी अंदाज 901 कोटी 79 लाखांचा निधी मिळवला. मात्र त्यांनी म्हाडासाठी 672 घरांचा बांधकाम केलं नाही.

अन्य एका खोट्या प्रकल्पाच्या नावे 138 कोटी जमवले - तसेच मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स या कंपनीने मेडोज नावाने एका प्रकल्पाची घोषणा करुन फ्लॅट घेणाऱ्यांकडून 138 कोटींची रक्कम जमा केली. या बेकायदेशीर माध्यमातून मे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्सच्या निर्देशकांनी जमा केलेली एकूण रक्कम ही एक हजार 39 कोटी 79 लाख इतकी आहे. यापैकी काही संपत्ती ही जवळच्या व्यक्तींच्या नावे वळवण्यात आली असं ईडीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यावर वळण्यात आले 55 लाख - या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आले. त्यानंतर प्रवीण यांनी ही रक्कम जवळच्या व्यक्तींच्या नावे फिरवली. यामध्ये कंपन्या नातेवाईकांचा समावेश होता. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केलाय.

चौकशी सुरु झाल्यावर पुन्हा पाठवले हे पैसे - ईडीने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्या खात्यावर पुन्हा 55 लाख वळवले. याच कालावधीमध्ये इतरही व्यवहार झाल्याचं ईडीने म्हटलंय.

अलिबागमध्ये आठ प्लॉट ज्यांच्या खरेदीत रोख व्यवहारही झाले - अलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील आठ प्लॉट हे वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने घेण्यात आलेले. स्वप्ना या संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत. या व्यवहारामध्ये नोंदणीच्या रक्कमेसोबतच थेट रोख व्यवहारही झालेत. ही सर्व संपत्ती ईडीने अटॅच केली आहे.

हेही वाचा - Case Against Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.