ETV Bharat / city

नारायण राणेंना सिंधुदुर्ग पलीकडे कोण विचारतो- अरविंद सावंत

author img

By

Published : Jul 8, 2021, 9:38 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी मंत्रिपदी शपथ ग्रहण केल्यानंतर नारायण राणे यांनी आज केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. मात्र यावर माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी टीका केली आहे.

अरविंद सावंत
अरविंद सावंत

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदी शपथ ग्रहण केल्यानंतर नारायण राणे यांनी आज केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. मात्र यावर माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अभिनंदन केले नाही, अशी टीका राणे यांनी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा काय प्रतिक्रिया त्यांनी दिली याची आठवण करावी, कोणत्या शब्दात अभिनंदन केले ते सांगावे. संकुचित आणि कुत्सित ही दोन उपाधी घेऊन वावरत असतात असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राणेंना दिले आहे.

'शिवसेनेवर टीका करण्यासाठी राणेंचा वापर केला जाईल'

'बाळासाहेब ठाकरे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करायचे. पण त्या टीकेला स्टेटस होते. कॅबिनेटमध्ये काम करताना काय होते हे आता त्यांना कळेल.' त्या ठिकाणी सचिव नसतो त्यामुळे नक्कीच कळेल'. केंद्रातील भाजपा सरकारला डमी लोक हवे आहेत. शिवसेनेवर टीका करण्यासाठी त्यांचा वापर केला जाईल, असेही सावंत म्हणाले.

'शिवसेनेला कॉर्नर करणे हा त्यांचा स्वतःचा गैरसमज'

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकण नाही तीन-चार आमदारांचे फक्त जिल्हा आहे. रत्नागिरी, ठाणे, मुंबई या ठिकाणी कोणाचे आमदार आहेत? याचाही राणे यांनी विचार करावा असा सल्लाही सावंत यांनी राणे यांना दिला आहे. राणेंना सिंधुदुर्ग पलीकडे कोण विचारतो आणि त्यांचा मुलगा शिकलाय अन्यथा त्या ठिकाणी भगवा फडकला असता. शिवसेनेला कॉर्नर करणे हा त्यांचा स्वतःचा गैरसमज आहे. त्यांना भाजपात प्रवेश मिळवताना उमेदवारी देणे, त्यांच्या मुलांना उमेदवारी देणं. शिवसैनिकांना पाडण्याचा प्रयत्न करणार हे सगळं विधानसभेत त्यांनी केले असल्याचे सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय: कोरोनाच्या लढाईविरोधात २३ हजार कोटींचे आरोग्य पॅकेज जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.