ETV Bharat / city

MH Assembly Winter Session 2021 : नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ; शिवसेनेची कारवाईची मागणी

author img

By

Published : Dec 27, 2021, 4:17 PM IST

हिवाळी अधिवेशनाच्या ( MH Assembly Winter Session 2021 ) दुसऱ्या दिवशी सरकारविरोधात पायर्‍यांवर घोषणाबाजी करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Nitest Rane Cat Voice On Aditya Thackeray ) यांची खिल्ली उडवण्यात आली होती. याप्रकरणी नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी आमदार आमदार सुहास कांदे ( Shivsena MLA Suhas Kande ) यांनी केली आहे.

MH Assembly Winter Session 2021
MH Assembly Winter Session 2021

मुंबई - मागच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनाच्या ( MH Assembly Winter Session 2021 ) दुसऱ्या दिवशी सरकारविरोधात पायर्‍यांवर घोषणाबाजी करणाऱ्या भाजप नेत्यांकडून मुख्यतः आमदार नितेश राणे यांच्याकडून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Nitest Rane Cat Voice On Aditya Thackeray ) यांची खिल्ली उडवण्यात आली होती. या संदर्भामध्ये शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत अशा पद्धतीने विधानभवनाच्या बाहेर किंवा त्या परिसरामध्ये गैरवर्तन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. तरीसुद्धा भाजप आमदार नितेश ( BJP MLA Nitest Rane ) राणे यांनी सिंधुदुर्ग येथे बोलताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांची चेष्टा मीच केली होती. हे जगजाहीर केले आहे. त्यासंदर्भात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे ( Shivsena MLA Suhas Kande ) यांनी विधानसभेत केली आहे.

'मीच तो आवाज काढला' -

राणे कुटुंबाकडून शिवसेना आणि ठाकरे कुटुंब यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. या संदर्भामध्ये मागच्याच आठवड्यात विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनात प्रवेश करत असताना 'म्याऊ.. म्याऊ..', असा आवाज काढत त्यांची खिल्ली उडवली होती. हा मुद्दा शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेमध्ये धरून ठेवला होता. या बाबतीत अशा आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा केली होती. परंतु तरीसुद्धा नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये बोलताना तो आवाज मीच काढला होता, असं उघडपणे जाहीर केल्याने शिवसेनेला डिवचण्याचे काम पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांकडून झाले आहे. म्हणूनच नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुभाष कांदे यांनी आज विधानसभेत केली.

नितेश राणे यांना होणार अटक? -

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी परब यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर या हल्ल्या मागचे मारेकरी गोट्ट्या सावंत व त्याच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गोटा सावंत हा स्वाभिमानी पक्ष तसेच नितेश राणे यांचा समर्थक असल्याने हा हल्ला नितेश राणे यांच्या सांगण्यावरून करून केला असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे, असं सुहास कांदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नितेश राणे यांना या हल्ल्याला जबाबदार ठरवत त्यांना कधीही अटक होऊ शकते, असंही आमदार सुहास कांदे यांनी सांगितलं आहे.

'पवार कुटुंबियांवर बोलायची पडळकरांची लायकी नाही' -

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार ठरवलेल आहे. विशेषकरून पवार कुटुंबियांकडून त्यांच्यावर हल्ला झाला आहे, असे ते ठामपणे सांगत आहेत. परंतु गोपीचंद पडळकर हे खोटे आरोप करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी लोकांमधून निवडून यावे. एक साधा दगड त्याच्या गाडीवर फेकण्यात आला होता. त्याचा एवढा गाजावाजा करण्याची गरज नाही. या ना त्या कारणाने प्रसिद्धी माध्यमांमध्ये पब्लिसिटीसाठी अशा पद्धतीचा स्टंट गोपीचंद पडळकर करत असल्याचा आरोपही कांदे यांनी केला आहे. पवार कुटुंबीयांवर बोलण्यासाठी गोपीचंद पडळकर अजून फार लहान आहेत, असा टोमणाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा - FIR against Kalicharan Maharaj : महात्मा गांधींबाबत विवादित वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.