ETV Bharat / city

The Kashmir Files : काश्मिरी पंडितांना शिवसेनेने शक्य तेवढी सर्व मदत केली - आदित्य ठाकरे

author img

By

Published : Mar 17, 2022, 7:32 AM IST

'द काश्मिर फाईल्स' ( The Kashmir Files ) या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त ( Tax free in Maharashtra ) करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ( Bharatiya Janata Party ) अनेक आमदारांनी केली आहे. यासंबंधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, शिवसेनेने काश्मिरी पंडित संकटात होते तेव्हा त्यांना शक्य ती सर्व मदत केली होती, असे म्हटले आहे. होळी खेळताना पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही ठाकरेंनी यावेळी केले.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

मुंबई - 1990 सालानंतर मुंबईत आणि महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांसाठी ( Kashmiri Pandits ) जेवढी मदत करता येणे शक्य होते, तेवढी सर्व मदत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने ( Shivsena ) त्यावेळी केली असल्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी म्हटले आहे. 'द काश्मीर फाईल' ( The Kashmir Files ) हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त ( Tax free in Maharashtra ) करण्यात यावा अशी मागणी भाजपकडून ( BJP ) सातत्याने होत आहे, त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे असते तर 'द काश्मीर फाईल' चित्रपटाला लगेच करमुक्त केले असते, आसा उपरोधक टोला भारतीय जनता पक्षाकडून ठाकरे सरकारला लगावला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी, काश्मिरी पंडितांना बाळासाहेब ठाकरे यांनी कशाप्रकारे मदत केली याची आठवण करून दिली. विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केलेले आरोप तसेच उपस्थित केलेल्या प्रश्नांना आपण उत्तर देणार नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : बहुमताच्या सरकारने पंडितांना न्याय दिला का?; नाना पटोलेंनी भाजपला सुनावले

पर्यावरणाची काळजी घेऊन सण साजरे करा

होळी हा सण महाराष्ट्रातच नाही तर, देशभरात आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो. मात्र कोणताही सण साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी आणि पर्यावरण स्नेही होळी खेळावी ( Eco-friendly Holi ) असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray Minister of Tourism ) यांनी यावेळी केले. तसेच गेली दोन वर्षे राज्य सरकार कोविड-१९ विरोधात लढत आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तसेच या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( Maha Budget session ) पर्यावरण मंत्री म्हणून आपण केलेल्या कामांबाबत उत्तरे दिली असून आपण आपल्या कामाबाबत समाधानी आहोत. आपल्याला सभागृहात बोलण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Kashmir Files Tax Free : राम कदमांचा सरकारला इशारा; काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करा, अन्यथा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.