ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, बंडखोरांबाबत घेणार मोठा निर्णय

author img

By

Published : Jun 25, 2022, 9:35 AM IST

शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत बंडखोर आमदारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता ( Shivsena on rebel MLAs ) आहे. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे आघाडी सरकार डळमळीत झाले ( Impact of Rebel MLA Eknath Shinde ) आहे. सरकार टिकवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

शिवसेना
शिवसेना

मुंबई - बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान देत, भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आज आयोजन ( Shiv Senas National Executive meeting) केले आहे. दुपारी शिवसेना भवनात १ वाजता ही बैठक पार पडणार ( Shivsena Bhavan ) आहे.

शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत बंडखोर आमदारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता ( Shivsena on rebel MLAs ) आहे. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे आघाडी सरकार डळमळीत झाले ( Impact of Rebel MLA Eknath Shinde ) आहे. सरकार टिकवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांविरोधात कारवाई तसेच सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेच याबाबत कायदेशीर लढाई आदी मुद्द्यांवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. बैठकीत मंथन केले जाणार आहे.



शिवसेनेच्या बंडखोरांवर होणार कारवाई?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेत्यांमध्ये राज्यातील सत्तासंघर्षावर खलबते झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी एकीकडे मातोश्रीवर ही बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे विधान भवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठीही हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. याबाबत कायदेशीर मार्गाने लढाई लढण्यासाठी राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांचीही मदत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना आगामी काळात काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.


पक्षशिस्त मोडल्याबद्दल त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई-एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदार आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने प्रतोद सुनील प्रभू यांनी केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. शुक्रवारी (दि.ल 25 जून) दुपारी विधिमंडळात सुरू झालेली बैठक तब्बल सहा तास चालली. या बैठकीनंतर 16 सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी बुधवारी सेनेच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला बंडखोर सदस्य अनुपस्थित राहिले. त्याप्रकरणी पक्षशिस्त मोडल्याबद्दल त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका सेनेचे नवे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे केली होती.

हेही वाचा-शिवसेनेचे पारडे आकड्यांच्या जिवावर जड, शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता

हेही वाचा-Sharad Pawar Meet CM : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार उतरले मैदानात; बंददाराआड मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा

हेही वाचा-Maharashtra Political Crisis : मंत्र्यांच्या अंगरक्षकांवर कारवाई होण्याचे संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.