ETV Bharat / city

Sharad Pawar Speech Book : तुम्ही प्रत्येकांची नावे लक्षात कसे ठेवता? कवी किशोर कदमांच्या प्रश्नांवर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

author img

By

Published : Dec 11, 2021, 4:27 PM IST

Updated : Dec 11, 2021, 5:29 PM IST

मुंबईत शरद पवारांच्या जुन्या भाषणांच्या नेमकचि बोलणे पुस्तकाचे प्रकाशन ( Sharad Pawar Speech Book Published ) झाले. या पुस्तकातील काही भाषणे साहित्यिक तसेच कलाक्षेत्रातील लोकांनी वाचून दाखवली. यावेळी वाचून दाखवलेल्या प्रत्येक भाषणाचा संदर्भ शरद पवार यांनी सांगितला. तसेच वाचून दाखवलेला भाषणानंतर शरद पवार यांना वाचक श्रोत्यांनी प्रश्नही विचारले. त्या प्रश्नांना तेवढ्यात दिलखुलासपणे शरद पवार यांनी उत्तरही दिले.

Sharad Pawar Speech Book
नेमकचि बोलणे शरद पवारांच्या भाषणाचे पुस्तक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1988 ते 1996 दरम्यान त्यांनी केलेल्या भाषणांपैकी निवडक 61 भाषणांचे 'नेमकचि बोलणें' हे पुस्तक शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ( Sharad Pawar birthday ) प्रकाशित करण्यात ( Sharad Pawar Speech Book Published ) आले. लेखक सुधीर भोंगळे यांनी शरद पवार यांच्या सर्व भाषणात आपल्याकडे संग्रहित करून ठेवली आहेत. त्या भाषणांपैकी 61 भाषणांचा पहिला खंड प्रकाशित करण्यात आला आहे. साहित्यिक रंगनाथ पठारे आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

कवी किशोर कदमांच्या प्रश्नांवर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

पवारांनी दिलखुलासपणे दिले उत्तरे -

या कार्यक्रमाला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. मुंबईतील नेहरू सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. असून, या पुस्तकातील काही भाषणे साहित्यिक तसेच कलाक्षेत्रातील लोकांनी वाचून दाखवली. यावेळी वाचून दाखवलेल्या प्रत्येक भाषणाचा संदर्भ शरद पवार यांनी सांगितला. तसेच वाचून दाखवलेला भाषणानंतर शरद पवार यांना वाचक श्रोत्यांनी प्रश्नही विचारले. त्या प्रश्नांना तेवढ्यात दिलखुलासपणे शरद पवार यांनी उत्तरही दिले.

तुम्ही प्रत्येकांची नावे लक्षात कसे ठेवता?

तुम्ही प्रत्येकांची नावे लक्षात कशी ठेवता? हा प्रश्न कवी किशोर कदम यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना उत्तर देतांना सांगितले की, राजकारणात कमी कष्टात यश मिळते जर तुम्ही प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवले तर. मुख्यमंत्री असताना एक महिला भेटायला आली त्यावेळी मी त्यांना कुसुम अशी नावाने हाक मारली. सायबाने मला हाक मारली हे लोकांना आवडते. या लहान गोष्टी जाणीव पूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. यशवंतराव चव्हाण आणि वसंत दादा पाटील यांनाही या गुणामुळे समाजात कायमस्वरूपाचे स्थान प्राप्त करण्यात यश मिळाले.

बाळसाहेब थोरातांनी सांगितली स्मरणशक्ती बाबत आठवण -

त्यानंतर महसूल मंत्री बाळसाहेब थोरात यांनीही शरद पवार यांच्या स्मरणशक्ती बाबत आठवण सांगितली. मी फर्ग्युसन कॉलेजला असताना पासून त्यांची भाषणे मी ऐकले आहेत. खूप जवळून त्यांचे काम मी पाहिले. पवार साहेब यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी असतो असे ते म्हणाले. शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते, मी राज्यात कृषी मंत्री होतो. जालनात कार्यक्रम होता. साखर कारखाण्यात गाळप बाबत, प्रश्न पवार साहेबांनी विचारले त्यावेळी मी मंत्री असताना थोडं दुर्लक्ष झाले होते म्हणून मी अंदाजे 2 लाख 15 हजार असे सांगितले. कारण एवढ्या लोकांत नाही माहीत कसे सांगणार. पण 15 दिवसांनी पुन्हा एका कार्यक्रमात भेट झाली आणि त्या वेळी पुन्हा विचारले आणि त्यावेळेस माहिती घेतली असल्याने 2 लाख 65 हजार असा बरोबर आकडा सांगितला. पण त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी सांगितले आकडा बरोबर लक्षात होता.

शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत शरद पवारांनी केली चिंता व्यक्त -

या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत चिंता व्यक्त केली असून महिला सुरक्षेच्या प्रश्नाबाबत देखील आपलं मत व्यक्त केले. सध्या देशामध्ये शाळेचा अभ्यासक्रम बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. ही चिंतेची बाब आहे. या मुद्द्यात जाणकारांनी लक्ष घालणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचा एक खासदार राम मंदिर बांधण्याचे काम झालं आहे आता अजून दोन महत्त्वाचे काम राहिली आहेत असे म्हणतात. ही गंभीर बाब असून बाबरी मज्जिद पडल्यानंतर देशामध्ये अशांतता निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अशीच अशांतता तयार होऊ शकते का? याबाबत देखील शरद पवार यांनी शंका उपस्थित केली.

हेही वाचा - Nawab Malik Tweet : गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, नवाब मलिकांचं नवीन ट्वीट

Last Updated : Dec 11, 2021, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.