ETV Bharat / city

नागपुरात देवेंद्र फडणवीसांवर अनेक गुन्हे दाखल - वकील सतीश उके

author img

By

Published : Jun 8, 2021, 8:52 AM IST

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपुरात अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रशासनामधील देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील सचिन वाझे सारख्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिष उके यांनी केली आहे. काल नागपूरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिष उके
सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिष उके

मुंबई - नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतीश उके यांची काल मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत, त्यांच्यावर कडाडून टीका सुद्धा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपुर मधील एक मोठे गुंड असून, ते कोणाही विरुद्ध काहीही षडयंत्र रचत असतात. फडणवीस हे कपटी आणि बहुरंगी आहेत, असा आरोप यावेळेस वकील सतिष उके यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिष उके

फडणवीसांवर कडाडून टिका

"राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपुरात अनेक गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर मधील निकटवर्तीय भाजपा पदाधिकारी आणि श्रीराम सेनेचे प्रमुख रणजित सफेलकर यांच्याकडून आर्किटेक एकनाथ निमगडे यांची 2016 साली हत्या करण्यात आली होती. रणजित सफेलकर हे फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मर्जीतले एक टोळी चालवणारे नागपूरमधील गुंड आहेत. नागपुर मधील मोक्याची 300 कोटींची जागा मिळवण्यासाठी हा खून करण्यात आलेला होता. निमगडे यांची हत्या झाली तेव्हा फडणवीस हे गृहमंत्री होते, त्यामुळे रणजित सफेलकर यांना फडणवीस यांनी पूर्णपणे संरक्षण दिले होते". असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिष उके यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

"देवेंद्र फडणवीस टोळीचे मुख्य सूत्रधार"

"विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील मोठे गुंड आहेत. त्यांच्यावर 324 कलमांतर्गत फसवणूक, बदनामी करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. निवडणूक अर्जातील आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिलेली नाही. त्यांनी आपल्यावरील अनेक गुन्हे लपवलेले सुद्धा आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एक बलात्कार आणि खून खटला प्रकरण दाबले आहे. तसेच बनावट स्टॅम्प पेपर प्रकरण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दाबले आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस या टोळीचे मुख्य सूत्रधार होते. फडणवीस कोणाही विरुद्ध काहीही षड्यंत्र रचत असतात. फडणवीस कपटी आणि बहुरंगी आहेत. गडकरी आणि मनोहर जोशी यांच्याबाबत का कोणी वाईट बोलत नाही? कारण देवेंद्र फडणवीस हे खूप खालच्या स्तरावरच राजकारण करतात. पोलीस आणि न्याय व्यवस्थेत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे सारखे आपले हस्तक पेरलेले आहेत", असा आरोप सामाजिक कार्यक्रते आणि वकील सतीश उके यांनी लावला आहे. तसेच प्रशासनामधील देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील सचिन वाझे सारख्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिष उके यांनी केली आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.