ETV Bharat / city

महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था नाही - संजय राऊत

author img

By

Published : Jun 28, 2021, 10:16 PM IST

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली असताना, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे उलट-सुलट चर्चांना यामुळे उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांना मी सतत भेटत असतो. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही संभ्रमावस्था नाही. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई - राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली असताना, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे उलट-सुलट चर्चांना यामुळे उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांना मी सतत भेटत असतो. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही संभ्रमावस्था नाही. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था नाही - संजय राऊत

भेट होतच असते -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील ३ दिवसांत दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. तसेच राऊत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही भेटले. या भेटीमुळे राज्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री नव्हते, तेव्हा त्यांना रोजच भेटायचो. परंतु आता मुख्यमंत्री आहेत, कामाचा व्याप वाढला आहे. आमचे फोनवर संभाषण होत असते. आता शरद पवार यांनाही भेटणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहेत. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर उघडपणे मत मांडले. राजकीय गोटात यानंतर खळबळ उडाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरून भाजपला सूचक इशारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठीवर भर दिला. मागील दोन दिवसांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दोन वेळा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या.

'पाच वर्षे सरकार टिकेल'

राऊत म्हणाले की, आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था नाही अत्यंत सुरळीत मार्गाने पुढे निघालेली आहे. शरद पवार यांनीही निवेदन केले आहे की, सरकार ५ वर्षांचा कालावधी पुर्ण करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावरही जाणवले की, बाहेर उगाचच चर्चा पसरवल्या जात आहेत. भ्रम निर्माण करण्यात येत आहे. परंतु अशा प्रकारचे भ्रम निर्माण करुन या सरकारच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. उत्तम पद्धतीने सरकार चालत आहे. अफवा आणि भ्रम निर्माण करुन अस्थिर राहील अशा भ्रमात राहू नये. मीडियाच्या माध्यमातून भ्रम निर्माण केले जात आहे. यामुळे वारंवार सांगावे लागत आहे. परंतु याच्यापुढे सांगण्याची वेळ येणार नाही कारण सर्वांना कृतीतूनच दिसेल की हे सरकार खंबीर आहे.

'शिवसेना सरनाईक यांच्या पाठीशी'

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने त्रास देण्यात येत आहे. त्यांच्याविषयी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब उपस्थित होते. पक्षाचा आमदार अडचणीत असेल तर त्यावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी बैठक घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपुर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी आहे. तसेच सगळ्या आमदारांचा आणि प्रताप सरनाईक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद आहे, अशी माहितीही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा - मुंबईकरांसाठी गुड न्यूज.. ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.