ETV Bharat / city

Chandiwal Commission चांदीवाल आयोगातील उलट तपासणीत सचिन वाझेने 'ही' दिली माहिती

author img

By

Published : Nov 24, 2021, 7:01 PM IST

परमबीर सिंगांच्या (Parabveer Singh Advocate in Chandiwal commission) वकिलांनी आयोगासमोर आज हजेरी लावली. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले होते. त्यामुळे समितीसमोर साक्षीदार म्हणून ते हजर होण्यास कोणतेही महत्त्व नाही. त्यांनी काही अधिकाऱ्यांकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप केले होते.

सचिन वाझे
सचिन वाझे

मुंबई- निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय उच्चस्तरीय समितीसमोर माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याची आज उलट तपासणी करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी आयोग करत आहे.


बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला नुकतेच चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने तो केवळ एक छोटे प्यादे असल्याचे सांगितले होते. तसेच, समितीवर पूर्णपणे विश्वास असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्याने स्वत:ला प्यादे म्हटले असल्याने मोठे खेळाडू कोण, असा प्रश्न उपस्थित झाला होता. देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Anil Deshmukh PA Sanjeev Palande) यांच्यावतीने शेखर जगताप यांनी आज वाझेची उलट तपासणी घेतली. यात वाझेंनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहे. ही उलट तपासणी संपली आहे. पुढील सुनावणी उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे.


हेही वाचा-ST Workers Strike LIVE : एसटी कर्मचारी संप मागे घेण्याची शक्यता, पगारवाढीला अर्थमंत्र्यांचा हिरवा कंदील



परमबीर सिंगांच्या वकिलांनी आयोगासमोर आज हजेरी लावली. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले होते. त्यामुळे समितीसमोर साक्षीदार म्हणून ते हजर होण्यास कोणतेही महत्त्व नाही. त्यांनी काही अधिकाऱ्यांकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप केले होते. याबाबत परमबीर सिंगांना थेटपणे कोणतीही माहिती नव्हती. ते आयोगासमोर साक्षीदार म्हणून हजर झाले तरी कायद्यानुसार त्याला काही महत्त्व असणार नाही. कारण ते सांगतील ती माहिती इतरांनी त्यांना सांगितलेली असेल, असे परमबीर सिंगांच्या वकिलांनी आयोगाला सांगितले. परमबीर सिंग हे साक्षीदार म्हणून हजर राहणार नसले तरी ते आयोगासमोर पुढील आठवड्यात (Parabveer Singh affidavit in Chandiwal commission) प्रतिज्ञापत्र सादर करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-Param Bir Singh : परमबीर सिंगांची पलटी; म्हणाले ऐकीव माहितीवरून आरोप केले!

संजीव पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांची सचिन वाझे यांची उलटतपासणी (Sachin Vaze cross examined ) घेतली आहे.

शेखर जगताप- अनिल देशमुख यांनी तुम्हाला पुन्हा पोलिस सेवेत रुजू होण्यास सांगितले होते, याचा पुरावा तुमच्याकडे आहे का?
सचिन वाझे - माझ्याकडे विनंती पत्राशिवाय दुसरे कोणतेही रेकॉर्ड नाही.

शेखर जगताप - सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2020 CIU मध्ये असताना तुम्हाला कोणती प्रकरणे तपासासाठी देण्यात आली होती? तुम्ही परमबीर सिंग यांना याबद्दल माहिती दिली होती का?
सचिन वाझे - मला (वैयक्तिकरित्या) कोणतीही प्रकरणे तपासासाठी देण्यात आलेली नाहीत.

शेखर जगताप- नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 मध्ये बार ट्रेड आणि हॉटेल अभ्यागत होते का?
सचिन वाझे- मला आठवत नाही

शेखर जगताप – तुम्ही CIU चा प्रभारी असताना डिसेंबर 2020 मध्ये महेश शेट्टी किंवा दया पुजारी यांना भेटला होता का?
सचिन वाझे- मला आठवत नाही.

शेखर जगताप - CIU ने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 मध्ये मुंबई शहरातील बार आणि रेस्टॉरंटवर छापे, झडती किंवा सीझ केले आहेत का?
सचिन वाझे- अशी कारवाई रेकॉर्डवर येत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नाही.

शेखर जगताप- तुम्ही फेब्रुवारीत कुठला गुन्ह्याचा तपास करत होते?
सचिन वाझे- मी सीआर नंबर डीसीपी सीआयडी ४० चा तपास करत होतो

शेखर जगताप -ऑगस्ट २०२०ते फेब्रुवारी २०२१ कुठला गुन्ह्याचा वैयक्तिक तपास करत होता का ?
सचिन वाझे - वैयक्तिक नाही. पण मी युनिट इंचार्ज म्हणून मी सीआयूतील गुन्ह्यात सुपर वायझिंग करत होतो.

शेखर जगताप - तुम्हाला सीआययूतून काढले, तेव्हा परमबीर यांनी गुन्ह्याच्या तपासाबाबत काही सांगितले होते का ?
सचिन वाझे - या गुन्ह्यांसंदर्भात परमबीर सिंग यांनी थेट काही मार्गदर्शन केले नाही. माझा इमिजेट बॉसकडून मार्गदर्शन हवे होते. जे अधिकृतरित्या नियमानुसार होते.

शेखर जगताप- तुम्ही संजीव पालांडे याना ओळखता का ?
सचिन वाझे - हो. ते गृहमंत्र्यांचे पीए आहेत, म्हणून ओळखतो.

शेखर जगताप- तुमची संजीव पालांडे यांच्याशी जवळीक मैत्री होती का ?
सचिन वाझे- नाही.

शेखर जगताप- तुम्ही फक्त महत्वाच्या गुन्ह्यां संदर्भातच गृहमंत्र्याकडे जात होता. त्यावेळी पालांडे यांच्याशी चर्चा करायचा का ?
सचिन वाझे- हो.

शेखर जगताप - २० मार्च २०२१ रोजी परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटरबाबत विचारले. यात गंभीर आरोप करण्यात आले होते. हे आपल्याला माहित होत का ?
सचिन वाझे - मला आठवत नाही.


शेखर जगताप - तुम्ही ज्ञानेश्वरी बंगला परिसरात फेब्रुवारी २०२१ मध्ये भेट दिली होती का? संजीव पालांडेला भेटला होतात का?
सचिन वाझे - हो, आम्ही भेटलो होतो.

शेखर जगताप - तुमच्या भेटीचे काय पुरावे आहेत का ?
सचिन वाझे -हो, मी त्या दिवशी पालांडे यांना भेटलो होतो. पण माझाकडे पुरावे नाहीत.

शेखर जगताप- जेव्हा संजीव पालांडे यांनी तुमच्याशी पैशासंदर्भात काही चर्चा केली होती का ?
सचिन वाझे- नाही, आमचे तसे काही बोलणे झाले नाही.

हेही वाचा-राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना ई़डीचे समन्स; 26 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.