ETV Bharat / city

Balasaheb Thorat On Commissioner Letter : 'पोलीस आयुक्त पांडे यांचे पत्र दखल घेण्यासारखे नाही, मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करणार!'

author img

By

Published : Apr 4, 2022, 3:09 PM IST

महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडे असलेले अधिकार हे आरडीएक्‍ससारखे असून त्यातून जीवंत बॉम्ब तयार होत आहेत. तो बॉम्ब भूमाफियाच्या मर्जीप्रमाणे वागत असल्याचे पत्र नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालक यांना लिहले ( Nashik Police Commissioner Deepak Pandey latter to Director General of Police ) आहे. मात्र दीपक पांडे यांचे पत्र समोर आल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Balasaheb Thorat On Commissioner Letter
बाळासाहेब थोरात

मुंबई - महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडे असलेले अधिकार हे आरडीएक्‍ससारखे असून त्यातून जीवंत बॉम्ब तयार होत आहेत. तो बॉम्ब भूमाफियाच्या मर्जीप्रमाणे वागत असल्याचे पत्र नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे ( Nashik Police Commissioner Deepak Pandey ) यांनी पोलीस महासंचालक यांना लिहले ( Nashik Police Commissioner Deepak Pandey latter to Director General of Police ) आहे. मात्र दीपक पांडे यांचे पत्र समोर आल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे पत्र दखल घेण्यासारखे नाही. संपूर्ण विभागाला दोष देणे आक्षेपार्ह आहे. अधिकाऱ्यांचे काही चुकत असेल तर, त्यांना तातडीने शिक्षा होत असते. कोणाला ही सवलत दिली जात नाही. राज्यात कायद्याचे राज्य असताना अधिकारी अशा प्रकारे वक्तव्य करतात आणि हे वक्तव्य प्रसारमाध्यमांसमोर येते हे दुर्दैव असल्याची खंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ( Balasaheb Thorat On Commissioner Letter ) व्यक्त केली आहे. याबाबतची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली जाईल असा इशाराही महसूल मंत्र्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचा पत्रातून आरोप - जमिनीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये भूमाफिया हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना हाताशी धरून जागामालकांचा छळ करीत आहेत. जमीन हडपण्यासाठी भूमाफियांकडून विस्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. महसूल अधिकारी हे आरडीएक्ससारखे आहेत. तर, कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार डिटोनेटरसारखे आहेत. आरडीएक्स व डिटोनेटर मिळून जिवंत बॉम्ब बनतो, जो भूमाफिया त्यांच्या मर्जीप्रमाणे वापरत असल्याचा खळबळजनक आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी लिहिलेल्या पत्रातून केला आहे.

हेही वाचा - Anil Deshmukh At Hospital : माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे जे रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.