ETV Bharat / city

Remembering Lata Mangeshkar : गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अंगी होते 'हे' अनोखे गुण

author img

By

Published : Feb 6, 2022, 2:20 PM IST

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passes Away ) आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. आज त्यांच्या सुप्त गुणांबाबत आपण जाणून घेणार आहेत.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

मुंबई : लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांना आपण आणि त्यांचे जगभरातले चाहते गानकोकिळा म्हणून ओळखत असे. तरीही त्यांची तेवढीच काही ओळख नाही बरं. लता दीदींच्या व्यक्तीमत्वात अनेक सुप्त गुण दडलेले होते. मात्र, हे गुण त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच माहिती होते. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

ऐरणीच्या देवा तुला गाण्याला दिले संगीत

लतादीदींचं ( Lata Mangeshkar ) आपण कायम गाणी ऐकलीत मात्र त्या स्वतः उत्सृष्ट संगीतकारही होत्या. चांगले संगीत ऐकणं आणि चांगल्या संगीताची निर्मिती करणं हेदेखील दीदींना तेवढंच जास्त आवडत असे. दीदींचे गुरू भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या साधी माणसं या सिनेमाला स्वतः दीदींनीच आनंदघन हे टोपणनाव वापरून संगीत दिलं आहे. याच सिनेमातील ऐरणीच्या देवा तुला हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या सिनेमाचं संगीत स्वतः दीदींचंच आहे.

फोटोग्राफीची आवड

लतादीदींना ( Lata Mangeshkar ) स्वतःला गाण्याएवढीच फोटोग्राफीची सुद्धा आवड होती. एखादा फोटोग्राफर फोटो काढत असेल तर त्याच्या लेन्सपासून त्याने घेतलेला अँगल बरोबर आहे की, हे त्या अगदी अचूक सांगत. दीदींचे अनेक फोटो दिवंगत ख्यातनाम छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी काढले होते. मात्र, त्यांना देखील दीदींचा हा गुण चांगलाच ठाऊक होता. दीदी एखाद्या चांगल्या फोटोग्राफरला लाजवतील एवढी सुंदर फोटोग्राफी करतात, असे राजाध्यक्ष म्हणत असत. एकदा सचिन आणि अंजली तेंडुलकर दीदींच्या घरी आल्यावर त्यांचा फोटो काढण्याचा मोह दीदींना झाला. त्याचवेळी तिथे हजर असलेल्या मोहन वाघ यांनी दीदी सचिन-अंजलीचा फोटो काढत असतानाचा फोटो काढला. हा फोटो दीदींच्या या गुणाची साक्ष देण्यासाठी पुरेसा बोलका ठरला.

लता दीदींचा मिश्किल स्वभाव

दिदींचा अजून एक पण फारच कमी लोकांना माहित असलेला गुण म्हणजे अर्थात त्यांचा मिश्किल स्वभाव. तसं तर कायमच त्या सर्वांशी विनम्रतेने वागत आणि बोलत. पण, आपल्या जवळच्या लोकांशी बोलताना त्यांची त्या कधी विकेट काढतील काही सांगता येत नाही. त्यांच्या जवळच्या आणि परिचयाच्या अनेक लोकांकडे दीदींच्या मिश्कील स्वभावाचे अनेक किस्से आहेत. दीदींना सहसा टीव्हीवर मुलाखत द्यायला फारसं आवडत नाही. मात्र, एकदा त्यांच्याकडे एक टीव्ही पत्रकार आली होती. तिने प्रश्न विचारताना अचानक तुम्ही आजवर अशी मनाला न पटणारी कोणती गोष्ट केली आहे का? असा प्रश्न दीदींना विचारला त्यावर क्षणाचाही विलंब न लावता हे काय इथे बसून तुम्हाला मुलाखत देतेय, असं म्हणत त्यांनी या महिला पत्रकाराला निरूत्तर केलं होतं. दीदींच्या मिश्किल स्वभावाचे, असे अनेक किस्से मंगेशकर कुटुंबातही कायम चर्चीले जातात.

हेही वाचा - Journey of Lata Didi About Songs : भारताचा मानबिंदू लतादिदिंचा आवाज शांत झाला! दिदिंचा गाण्यांबद्दल हा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.