ETV Bharat / city

Thackeray VS Shinde: बंडखोर आमदारांकडून ठाकरे आडनावाचे वलय कमी करण्याचा प्रयत्न

author img

By

Published : Aug 3, 2022, 11:27 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना दादासाहेब म्हणण्याची प्रथा बंडखोर आमदारांनी सुरू केली ( rebel MLAs calling MP Shrikant Shinde as a Dadasaheb ) आहे. ठाकरे वलय असलेल्या आडनावाचे महत्त्व कमी करून शिंदें पुत्राला मानसन्मान देण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Thackeray VS Shinde
ठाकरे शिंदे

मुंबई - बंडखोरीनंतर महाराष्ट्र पिंजून काढणारे आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध शिंदे गटातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली ( Shinde group MLAs aggressive against Aditya Thackeray ) आहे. आदित्य यांना साहेब म्हणणे या आमदारांना रुचत नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना दादा म्हणण्याची प्रथा बंडखोर आमदारांनी सुरू केली ( rebel MLAs calling MP Shrikant Shinde as a Dadasaheb) आहे. ठाकरे वलय असलेल्या आडनावाचे महत्त्व कमी करून शिंदें पुत्राला मानसन्मान देण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली ( shinde group try to reduce Thackeray ascendancy ) आहे.


हिंदुत्वाची भूमिकेवरून वाद - विधान परिषदेच्या निवडणूकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांचा भडीमार करत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्या विरोधात सुरतमध्ये जाऊन बंड पुकारले. सेनेच्या ४० आमदारांनी शिंदेंना पाठिंबा देत सुरतमार्गे गुवाहाटी, गोवा असा प्रवास करत भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत तो शिंदेंना बहाल केला. शिंदे मुख्यमंत्री होताच हिंदुत्वाची भूमिकेवरून आरोप प्रत्यारोपांवर भर दिला.



हिंदुत्वावरून ठाकरेंकडे निशाणा - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू होता. शिवसेना संपलेली आम्ही पाहू शकत नाही. बाळासाहेबांचे, आनंद दिघे यांचे हिंदुत्व पुढे नेण्यासाठी आम्ही खरी शिवसेना आहोत, असे सांगत बंडखोर शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारीना आपल्या गोटात ओढू लागला. आमदारांपाठोपाठ खासदारांनी शिंदे गटाची कास धरली. ठाणे, नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर आधी भागातील आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी शिंदेना पाठिंबा देत आहेत. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणारा बंडखोर आमदारांचा गट आता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत असल्याचे दिसून येत आहे.


आदित्यला साहेब म्हणावं लागतं - सेनेतील बंडखोरीनंतर युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक ( Shiv Sena leader Aditya Thackeray aggressive ) झाले आहेत. राज्यभरात संवाद दौरे काढत असून बंडखोर आमदारांच्या खासदारांच्या मतदार संघात जाऊन आव्हान देत आहेत. ठाकरे यांच्या यात्रांना शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. वाढत्या प्रतिसादामुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे बंडखोर आमदार, खासदारांकडून आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडत आहेत. शिवसेनेच्या जडणघडणीसाठी वर्षानुवर्षे संघर्ष केला. आदित्य ठाकरे, आमच्यावर टीका करू शकत नाहीत, असे सूर बंडखोर शिंदे गटातून उमटू लागले आहेत. तसेच युवासेनाप्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना साहेब बोलावे लागते अशी आगपाखड सुरू केली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि ठाकरेंचे ते वारस आहेत, त्यांचा हा मानसन्मान आहे. आदित्य ठाकरे यांनी पूर्वक बोलावे असा सल्लाही दिला जातो आहे.


श्रीकांत शिंदे बनले बंडखोरांचे दादासाहेब - सेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड पुकारला. खासदारांनी श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गट तयार केला. त्यामुळे शिंदे गटात श्रीकांत शिंदे यांचे वजन सध्या वाढले आहे. अनेक बंडखोर आमदार खासदार आजी माजी नगरसेवक श्रीकांत शिंदे यांना दादा साहेब म्हणू लागले आहेत. छोट्यात छोटं काम ही श्रीकांत शिंदे यांच्या परवानगी शिवाय होत नसल्याचे समजते. त्यामुळे काम करण्यासाठी बंडखोर आमदारांकडून श्रीकांत शिंदे यांना दादासाहेब उपाधी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे कुटुंबाचे वजन कमी करून शिंदेंना वरचढ करण्याचा बंडखोरांच्या गटाचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते.


हेही वाचा -Neelam Gorhe on uday samant attack : खोटे आरोप करून शिवसेनेला बदनाम करू नका - नीलम गोऱ्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.