मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे गुवाहाटीवरुन गोव्यात काल दाखल झाले होते. तेथून ते आज मुंबईतील अंधेरी विमानतळावर दाखल ( Eknath Shinde In Mumbai ) झाले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या घराकडे रवाना रवाना झाले आहेत. ते प्रचंड सुरक्षा दलासह विमानतळाच्या बाहेर पडत आहेत.
भाजपच्यावतीने मंत्रिपदे - देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार ( sudhir mungantiwar ), चंद्रकांत पाटील ( chandrakant patil ), गिरीश महाजन ( girish mahajan) यांसारख्या मातब्बर नेत्यांसह मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचसोबत राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी पाटील निलंगेकर, राणा जगजीत सिंह पाटील, संजय कुटे, जयकुमार रावल, सुरेश खाडे, जयकुमार गोरे, देवयानी फरांदे, अशोक उईके, परिणय फुके, रणधीर सावरकर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विनय कोरे आणि राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यमंत्री पदाची संधी - गोपीचंद पडळकर, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, नितेश राणे, निलय नाईक, राहुल कुल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाकडून यांना संधी - एकनाथ शिंदे, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, बच्चू कडू, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
तर राज्यमंत्री म्हणून - संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. एकूणच राज्यातील सर्व महसूल विभागांना आणि सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा आणि मंडळाचा चेहरा सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न फडणवीस शिंदे यांच्याकडून करण्यात येत असल्याचे या यादीवरून दिसून येते.
भाजपच्या गटात आनंदोत्सव - भाजने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या नंतर दुसरीकडे बंडखोर आमदारांनी गुवाहाटीवरुन गोवा गाठले आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. समर्थक आमदारांच्या सहिचे पत्र घेऊन ते निघाल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील आणि बंडखोर आमदारांचे भाजपला समर्थन असल्याचे पत्र देतील त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करतील. रात्री राजभवन गाठून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सादर केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गटात आनंदोत्सव पहायला मिळाला.
उद्या शपथविधी होण्याची शक्यता - महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळल्यानंतर, मी पुन्हा येईन असे सांगणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आता थोडा अवधी शिल्लक राहिलेला आहे. उद्या सायंकाळी शपथविधी होणार असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. 1 जुलैला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडेल. मात्र त्यांच्या सोबत अजून आठ ते दहा मंत्री पहिल्यांदा शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. भारतीय जनता पक्षाकडून पाच ते सहा मंत्री, तर एकनाथ शिंदेच्या गटाकडून चार ते पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा - Fadnavis Shinde Government : राज्यात फडणवीस शिंदे सरकार ; नव्या सरकारमध्ये या नेत्यांना स्थान