ETV Bharat / city

Rakesh Jhunjhunwala journey राकेश झुनझुनवाला यांनी केली होती पाच हजार रुपयांपासून सुरुवात

author img

By

Published : Aug 14, 2022, 2:39 PM IST

Updated : Aug 14, 2022, 4:32 PM IST

शेअर बाजारातील Share Market बिग बुल Big Bull आणि देशाचे प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे आज निधन झाले ते 62 वर्षांचे होते त्यांच्या निधनानं उद्योग जगतात मोठी दरी निर्माण झाली आहे शेअर बाजारात पैसा कमावल्यानंतर झुनझुनवाला एअरलाइन क्षेत्रात Airline Sector उतरले होते आकासा एअर Akasa Air या नवीन विमान कंपनीत त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती.

Rakesh Jhunjhunwala
राकेश झुनझुनवाला

मुंबई शेअर मार्केटमधील Share Market बिग बुल Big Bull आणि भारताचे प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे आज निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं उद्योग जगतात मोठी दरी निर्माण झाली आहे. शेअर बाजारात पैसा कमावल्यानंतर झुनझुनवाला एअरलाइन क्षेत्रात Airline Sector उतरले होते. आकासा एअर Akasa Air या नवीन विमान कंपनीत त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती. शेअर बाजारात Stock Market गुंतवणूक करणार्‍या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती Rakesh Jhunjhunwala Networth आहे. गंमत म्हणजे एवढी संपत्ती असलेल्या या व्यक्तीचा प्रवास केवळ 5 हजार रुपयांपासून सुरू झाला.

उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेअर बाजार राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफे Warren Buffett म्हटले जाते. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेअर बाजार आहे. झुनझुनवाला यांची ही यशोगाथा अवघ्या पाच हजार रुपयांपासून सुरू झाली. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटींच्या आसपास आहे. या यशामुळे झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे Warren Buffet असे संबोधले जाते. सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गमावत असतानाही झुनझुनवाला कमाई करतात.

असा सुरू झाला गुंतवणुकीचा प्रवास शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार झुनझुनवाला हे 1985 मध्ये दलाल स्ट्रीट येथे पहिले पाऊल ठेवले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची प्रेरणा त्यांना वडिलांकडून मिळाली. मात्र झुनझुनवाला यांनी पहिल्यांदा शेअर बाजारात पैसे गुंतवायचे ठरवले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. इतकेच नाही तर झुनझुनवाला यांच्या वडिलांनी सक्त ताकीद दिली होती. त्यांनी कोणत्याही मित्राकडून पैसेही उधार घेऊ नयेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की जर तुला शेअर मार्केटमध्ये उतरायचे असेल तर आधी मेहनतीने पैसे कमाव आणि गुंतव.

टाटांनी उघडले झुनझुनवालांचे नशीब व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये पाच हजार रुपये गुंतवून गुंतवणूकदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. टाटा शेअर्समधून त्यांना सर्वात मोठा ब्रेक मिळाला. एकेकाळी त्यांनी टाटा ग्रुपच्या टाटा टी कंपनीचे पाच हजार शेअर्स 43 रुपये दराने खरेदी केले होते. तीन महिन्यांत टाटा टी (Tata Tea) चा शेअर खूप वर चढला. त्यानंतर झुनझुनवाला यांनी हा शेअर 143 रुपयांना दिला. ही 1986 मधील गोष्ट आहे, आणि या निर्णयामुळे झुनझुनवाला यांना तीन महिन्यांत 2.15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 लाख रुपयांचा नफा झाला.

टायटनने त्यांना मार्केट बिगबुल बनवले पुढच्या तीन वर्षांत राकेश झुनझुनवाला शेअर्समध्ये पैसे गुंतवून करोडपतींच्या यादीतमध्ये समाविष्ट झाले. या तीन वर्षांत त्यांना सुमारे अडीच कोटी रुपयांचा नफा झाला. टाटा समूहाच्या आणखी एका कंपनीने झुनझुनवाला बिगबुल बनले. टाटा समूहाची कंपनी टायटन (Titan) मध्ये त्यांनी 2003 साली पैसे गुंतवले. त्यानंतर त्यांनी तीन रुपये दराने टायटनचे सहा कोटी शेअर्स खरेदी केले. एकेकाळी झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे सुमारे 4.5 कोटी शेअर्स होते. ज्यांचे मूल्य 7000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. या मोठ्या कंपन्यांमध्ये झुनझुनवालांचे शेअर्स झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या सेल (SAIL), टाटा मोटर्स (Tata Motors) टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications),

या मोठ्या कंपन्यांमध्ये झुनझुनवालांचे शेअर्स ल्यूपिन Lupin टीव्ही 18 TV18 डीबी रियल्टी DB Realty इंडियन हॉटेल्स Indian Hotels), इंडियाबुल्स हाऊसिंग India Bulls Housing Finance कंपन्या जसे की फायनान्स, फेडरल बँक Federal Bank करुर वैश्य बँक Karur Vaishya Bank एस्कॉर्ट्स लिमिटेड Escorts Ltd टायटन कंपनी Titan Company एमसीएक्स MCX यांचा समावेश आहे. याच आठवड्यात, त्यांनी डेल्टा कॉर्पचे 2.5 दशलक्ष शेअर्स विकले. त्यानंतर कंपनीच्या स्टॉकचे मूल्य 10 टक्क्यांहून जास्त घसरले. झुनझुनवाला यांच्याकडे अजूनही टायटन कंपनीचे भरपूर शेअर आहेत.

हेही वाचा Beed Road Accident News पाटोदा मांजरसुंभा रोडवर स्विफ्ट आयशर टेम्पोच्या अपघातात 6 ठार

Last Updated : Aug 14, 2022, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.