ETV Bharat / city

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक मतदानाला सुरुवात.. बाळासाहेब थोरात म्हणाले, 'विजय आमचाच'

author img

By

Published : Jun 10, 2022, 9:41 AM IST

Updated : Jun 10, 2022, 10:28 AM IST

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झाले ( Rajya Sabha Election Voting ) आहे. काँग्रेसचे आमदार विधानभवनात दाखल झाले ( Congress MLAs In Vidhan Bhavan ) आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Thorat ) यांनी पहिल्याच फेरीत आमचे चारही उमेदवार जिंकतील, अशी प्रतिक्रिया देत विजयाचा विश्वास व्यक्त केला ( MVA Candidate Will Won RS Election ) आहे.

rajya sabha election balasaheb thorat
राज्यसभा निवडणूक बाळासाहेब थोरात

मुंबई - राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत चुरस लागलेली असताना सहावा उमेदवार कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले ( Rajya Sabha Election Voting ) आहे. काँग्रेसचे आमदार मतदानासाठी दाखल झाले ( Congress MLAs In Vidhan Bhavan ) आहेत. याविषयी बोलताना काँग्रेसचे नेते, मंत्री बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Thorat ) यांनी सांगितलं आहे की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून ( MVA Candidate Will Won RS Election ) येतील.

नाराजी नाही : दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या मतांचा कोटा वाढला असल्याकारणाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. या विषयावर बोलताना शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले की, अशा पद्धतीची कुठलीही नाराजगी नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते नवाब मलिक व अनिल देशमुख ही कमी होण्याची शक्यता असल्याकारणाने त्यांनी त्यांचा कोटा वाढवलेला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, 'विजय आमचाच'

अपक्षांची मते निर्णायक : विधानसभेतून राज्यसभेवर ( Rajyasabha Election 2022 ) जाणाऱ्या सहा जागांसाठी आज ( 10 जून ) मतदान होत आहे. एकूण सात उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून, त्यापैकी सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी विरोधात भाजपाने जोर लावला आहे. मात्र, अपक्ष, इतर छोटे पक्षांच्या आमदारांची मते निर्णायक ठरणार असल्याने ते कोणाला मतदान करणार हे या निवडणूक प्रक्रियेनंतर समोर येणार आहे.

मंत्री भरणेंनी केले मतदान : राज्यसभा निवडणूक मतदानाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रातील मतदानाला सुरुवात झाली, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मतदान केले.

एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा : एमआयएमचा महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा. खा. इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन दिली माहिती. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याचे ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे.

इम्रान प्रतापगढी यांना प्रथम प्राधान्य - काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना प्रथम प्राधान्य देण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. तर एमआयएमने आघआडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडीचे बळ वाढले आहे. याचा फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : Rajya Sabha Election Voting : राज्यसभा निवडणूक.. भाजप, काँग्रेसचे आमदार विधानभवनात दाखल

Last Updated : Jun 10, 2022, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.