ETV Bharat / city

Uddhav Thackeray On Rajnath Singh : उद्धव ठाकरेंना डिवचणे राजनाथ सिंह यांना पडले भारी

author img

By

Published : Jul 12, 2022, 9:12 PM IST

Former Shiv Sena MLAs meet on Matoshri on Tuesday
मंगळवारी शिवसेनेच्या माजी आमदारांची मातोश्रीवर बैठक

राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांनी राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी ( presidential election ) उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) संपर्क साधताना, अस्सलाम अलैकुम म्हणत डिवचले. उद्धव ठाकरे यांचा यामुळे चांगलाच पारा चढला, महाविकास ( Mahavikas Aghadi ) आघाडीत गेलो असलो, तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, राजनाथ सिंह, तुम्ही हे लक्षात ठेवावे, अशा शब्दांत ठाकरेंनी राजनाथ सिंह यांना ठणकावले.

मुंबई - शिवसेनेना महाविकास आघाडीसोबत ( Mahavikas Aghadi ) गेल्याची सल भाजपच्या आजही मनात कायम आहे. तसे भाजपच्या नेत्यांकडून वारंवार बोलून दाखवले जाते. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Defense Minister Rajnath Singh ) यांनी देखील थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) 'अस्सलाम अलैकुम' अशा शब्दांत डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार राजनाथ सिंह यांच्या चांगलाच अंगलट आला. उद्धव ठाकरेंनी त्यांचा ठाकरी भाषेत चांगलाच समाचार घेतला. ठाकरेंनी राम, जय श्री राम म्हणत, राजनाथ सिंहचा निरोप घेतला. यानंतर माजी आमदार चांगले संतापले होते.

Former Shiv Sena MLAs meet on Matoshri on Tuesday
मंगळवारी शिवसेनेच्या माजी आमदारांची मातोश्रीवर बैठक

माजी आमदारांची मातोश्रीवर बैठक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला दिवसेंदिवस मोठे हादरे बसत आहे. अनेक निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटात ( Eknath Shinde Group ) सामिल होत आहेत. शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून बैठकींवर भर दिला आहे. जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष, शहरप्रमुखांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. मंगळवारी शिवसेनेच्या माजी आमदारांची मातोश्रीवर आज बैठक पार पडली. बैठकीला ३० ते ३५ जण उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर ( Discussion on presidential election ) चर्चा झाली. दरम्यान, ठाकरे यांनी राजनाथ सिंह यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला.

Former Shiv Sena MLAs meet on Matoshri on Tuesday
मंगळवारी शिवसेनेच्या माजी आमदारांची मातोश्रीवर बैठक

हेही वाचा - Shiv Sena Support Droupadi Murmu : एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूला शिवसेना पाठिंबा देणार - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंना वापरून चिथवण्याचा प्रयत्न - राजनाथ सिंह एनडीए तर्फे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत. देशभरातील सर्व समविचारी पक्षांच्या प्रमुखांना ते फोन करुन एनडीए उमेदवाराला मतदान करण्याची विनंती करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, अरबी भाषेतील मुस्लीम धर्मियांकडून एकमेकांना अभिवादन करण्यापूर्वी 'अस्सलाम अलैकुम' असे विधान केले जाते. राजनाथ सिंहांनी हेच वाक्य उद्धव ठाकरेंना वापरून चिथवण्याचा प्रयत्न केला.

Former Shiv Sena MLAs meet on Matoshri on Tuesday
मंगळवारी शिवसेनेच्या माजी आमदारांची मातोश्रीवर बैठक
ठाकरेंनी राजनाथ सिंहना ठणकावले - राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेस सोबत महाविकास आघाडी करत शिवसेनेने सरकार स्थापन केले होते. शिवसेनेने हिंदूत्व सोडले असा आरोप करत, भाजपने वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका केली. भाजपचे सर्व मुद्दे उद्धव ठाकरेंनी यापूर्वी खोडून काढले. मात्र, राजनाथ यांनी राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना संपर्क साधताना, अस्सलाम अलैकुम म्हणत डिवचले. उद्धव ठाकरे यांचा यामुळे चांगलाच पारा चढला, महाविकास आघाडीत गेलो असलो, तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, राजनाथ सिंह, तुम्ही हे लक्षात ठेवावे, अशा शब्दांत ठाकरेंनी राजनाथ सिंह यांना ठणकावले. राजनाथ सिंह यांचीही त्यानंतर तत फफ झाली. अखेर राम, 'जय श्रीराम' म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचा निरोप घेतला.

हेही वाचा - Sharad Pawar : अनेक राज्य सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.