ETV Bharat / city

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित, ट्विटरवरुन दिली माहिती

author img

By

Published : May 20, 2022, 9:50 AM IST

Updated : May 20, 2022, 11:17 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित, राज ठाकरे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राज यांच्या पायाचे दुखणे काही थांबत नाही. त्यावर ऑपरेशन करण्याचीही गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार का हा प्रश्नच आहे. तसेच उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर विरोध केला आहे.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे. तुर्तास अयोध्या दौरा स्थगित असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आजारपणामुळे राज यांचा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली होती. राज ठाकरे स्वतः याबाबत घोषणा करतील असे सांगण्यात येत होते. त्यानुसार आता त्यांनी याबाबतची घोषणा सोशल मीडियातून केली आहे.

राज ठाकरेंची २२ मे रोजी पुण्यामध्ये सभा आहे. या सभेनंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. डॉक्टरांनी परवानगी दिली तरच राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. दिवसांपूर्वीच पुणे दौरा अर्धवट सोडून ते मुंबईला गेले होते. आता अयोध्या दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध - राज यांच्या पायाचे दुखणे काही थांबत नाही. त्यावर ऑपरेशन करण्याचीही गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार का हा प्रश्नच आहे. तसेच उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर विरोध केला आहे. रामाच्या वंशजांना मारहाण करणाऱ्यांना अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले. त्याचवेळी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी ते त्यांच्या मोठ्या कार्यक्रमाची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. ( Bjp Mp Brij Bhushan Singh Target Raj Thackeray ) श्रद्धा आणि तत्त्वज्ञानासाठी अयोध्येत यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे, मात्र राजकारण करायला आल्यास उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ देणार नाही, असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले होते. राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर यामुळेही परिणाम झाल्याची चर्चा आहे.

खा. मनोज तिवारींनी मात्र केले राज ठाकरे यांचे स्वागत - खासदार मनोज तिवारी, खासदार तथा अभिनेते रवी किशन, भाजप नेते आणि अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ यांनी मुंबईतील जुहू मिलेनियम क्लबला भेट दिली. यावेळी मनोज तिवारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर भाष्य केले. राज ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत केले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांना विरोध करण्याची काही गरज नसल्याचे ते म्हणालेत. मुंबई दौऱ्यावर ते दोन दिवसांपूर्वी आले होते. त्यावेली त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली होती. राज यांचा विरोध करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले होते.

हेही वाचा - Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह आक्रमक! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध कायम

Last Updated : May 20, 2022, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.