ETV Bharat / city

Maharashtra Monsoon update : राज्यात 3 दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भात काळजी घेण्याची गरज

author img

By

Published : Jul 24, 2022, 9:54 AM IST

हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ( Medium To Heavy Rain Chances ) आहे. पालघर, नाशिक, परभणी, लातूर, नांडेद, हिंगोली, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात 24 जुलैला मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Monsoon update
महाराष्ट्र मान्सून अपडेट

मुंबई - येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ( Medium To Heavy Rain Chances )आहे. त्यातही विदर्भातील पावसाकडे लक्ष देण्याची गरज ( Rain In Vidarbha ) असल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भासह राज्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. सावधगिरी बाळगून शेतीची कामे करावीत असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले ( Maharashtra Monsoon Rain Update ) आहे.

कुठेकुठे पडणार पाऊस - पालघर, नाशिक, परभणी, लातूर, नांडेद, हिंगोली, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात 24 जुलैला मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर 25 जुलैला अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, कामगांरांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तर राज्याच्या इतर भागात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडेल.

  • 22 Jul, येत्या ३, ४ दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
    🔸🌩️⚡️मेघगर्जनेशी संबंधित काही ठिकाणी.
    🔸या शनिवार व रविवार, थोडा अधिक प्रभाव संभवतो.☔️☔️
    🔸IMD GFS model guidance for 23-24 indicate strengthening of lower level westerlies over Konkan region.
    - IMD pic.twitter.com/Hy8lzOZz3d

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुण्यात पाऊस - पुण्यात लोणावळा परिसरात काल 12 तासांत 61 मिलीमीटर वापसाची नोंद करण्यात ( Rain In Lonavala Pune )आली. तर शिवाजी नगर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मागे झालेल्या पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. लोणावळा आणि शिवाजीनगर वगळता अन्य काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे.

विदर्भात धुवाधार पाऊस - 20 तारखेला विदर्भात झालेल्या पावसाने चांगलेच थैमान घातले होते. विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला होता. परिणामी विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती पहायला मिळाली. तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्तयात आला होता. इतर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे अमरावतीच्या 30 तर वर्ध्याच्या 42 गावांचा संपर्क तुटला होता. मदत आणि बचावकार्यासाठी वर्ध्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्या होत्या.

चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा वेढा - जिल्ह्यातील नद्या संततधार पावसाने फुगल्या असून जिल्ह्यात पुराचा फटका बसला. चिमूर पाठोपाठ भद्रावती, वरोरा आणि मूल तालुक्यातील अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडली होती. शेकडो घरे पाण्याखाली गेली होती. माजरी या गावाला पुराने वेढले . ( Flood Situation in Chandrapur ) तर बेलसनी हे गाव पुर्णतः पाण्याखाली गेले . ( Heavy Rains Chandrapur ) या सर्व ठिकाणी बचावकार्य सुरू होते. शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

भंडारदरा धरण 80 % भरले - 20 जुलैच्या पावसात भंडारदरा येथे 105 मीमी पावसाची नोंद झाली. घाटघर येथे 126 मीमी तर रतनवाडी येथे 129 मीमी व वाकी येथे 83 मीमी पावसाची नोंद झाली . कृष्णावंती नदीवरील वाकी लघुबंधाराही भरलेला असुन कृष्णावंती नदी 578 क्युसेसने वाहत आहे. भंडारदरा धरणात 525 दलघफु नविन पाणी आले तर 168 दलघफुन नविन पाणी आल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 8720 दलघफु झाला आहे. तर निळवंडे धरणही 74 टक्के भरले असुन पाणीसाठा 6214 दलघफु झाल्याची माहीती निळवंडे धरण शाखेचे प्रमुख कुणाल चोपडे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Neeraj Chopra, World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.