ETV Bharat / city

Antilia Explosive Case : प्रदीप शर्मा यांना जामीन अर्जावर न्यायालयाचा दिलासा नाही; पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी

author img

By

Published : Dec 14, 2021, 5:50 PM IST

जुलै महिन्यात अँटिलिया स्फोटके प्रकरण ( Antilia Explosive Case ) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण ( Mansukh Hiren murder case ) यामध्ये माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA अटक केली होती. त्यांनी अटकेतून जामीन मिळवा यासाठी एनआयए विशेष न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयात आज (मंगळवार) सुनावणी झाली.

Antilia Explosive Case
प्रदीप शर्मा

मुंबई - मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटके प्रकरण ( Antilia Explosive Case ) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण ( Mansukh Hiren murder case ) यामध्ये माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA अटक केली होती. जुलै महिन्यात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा यांनी एनआयए विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज मंगळवार (दि. 14) रोजी सुनावणी झाली मात्र प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने कुठलाही दिलासा दिला नाही.

21 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी -

अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने NIA अटक केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना एनआयएने अटक केली होती. प्रदीप शर्मा यांना येण्याने अटक करून 6 महिने झाले आहे. सध्या प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहे. जामीन देण्यात यावा याकरीता प्रदीप शर्मा यांच्याकडून मुंबई NIA विशेष न्यायालयात अर्ज केला होता मात्र न्यायालयाने आज प्रदीप शर्मा यांना कुठलाही दिलासा दिला नसून पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे.

प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप -

मुंबई पोलीस खात्यात 117 हून अधिक एन्काऊंटर करणाऱ्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेली आहे. संतोष शेलार या व्यक्तीची राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशी केल्यानंतर प्रदीप शर्माचा या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होतो. प्रदीप शर्मा यांच्या घरातून राष्ट्रीय तपास यंत्रणेला परवाना संपलेले पिस्तूल व काही जीवंत काडतुसे आढळून आली होती. मनसुख याची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यामध्ये प्रदीप शर्मा याचा सर्वात मोठा सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला होता. सचिन वाझे व प्रदीप शर्मा या दोघांनी आनंद जाधव, संतोष शेलार यांच्यासह बऱ्याच वेळा मिटींग केल्याचाही राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा -

प्रदीप शर्मा हे 1983 पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. एन्काऊटंर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. मुंबई पोलीस दलात असताना त्यांनी 113 गँगस्टरचे एन्काऊटंर केल्याची नोंद आहे. तसेच 2010 मध्ये लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात त्यांना अटक झाली होती. तर 2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले होते. त्यांना प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलीस दलात रूजू करण्यात आले. 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती. त्यासोबतच त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला होता.

काय आहे मनसुख हिरेन प्रकरण -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची असल्याचे तपासांत पुढे आले होते. त्यानंतर मनसुख हिरेन त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी 7 जणांना अटक केली होती. आज पुन्हा 3 जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 10 झाली आहे.

हेही वाचा - मनसुखच्या हत्येसाठी आरोपींनी 45 लाखांची सुपारी दिली, एनआयएची कोर्टात माहिती

हेही वाचा - Sachin Waze re-examination : वाझे यांची अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून आज पुन्हा उलट तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.