ETV Bharat / city

Mansukh Hiren Murder Case : मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्माचा जामीन अर्ज फेटाळला

author img

By

Published : Feb 16, 2022, 5:38 PM IST

Updated : Feb 16, 2022, 8:45 PM IST

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (Mansukh Hiren Murder Case) एनआयएने अटक केलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma Bail) यांचा जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

pradeep sharma bail
मनसुख हिरेन-प्रदीप शर्मा

मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (Mansukh Hiren Murder Case) एनआयएने अटक केलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma Bail) यांचा जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्माला अटक केली होती. तेव्हापासून शर्मा न्यायालयीन कोठडीत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एनआयए करत आहे. हिरेन हत्येप्रकरणी प्रदीप शर्माला एनआयएने अटक केली होती.

NIA चा दावा काय?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती असा दावा एनआयएच्या वकिलांनी कोर्टात केला.

आतापर्यंत किती जणांना बेड्या?

1. सचिन वाझे

2. विनायक शिंदे

3. रियाझ काझी

4. सुनील माने

5. नरेश गोर

6. संतोष शेलार

7. आनंद जाधव

8. प्रदीप शर्मा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठ ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत डोक्यालाही मार लागलेला होता.

Last Updated : Feb 16, 2022, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.