ETV Bharat / city

मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

author img

By

Published : Aug 29, 2019, 8:14 AM IST

Updated : Aug 29, 2019, 9:03 AM IST

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी 2014 मध्ये घेतलेले हे दोन फ्लॅट 2018 मध्ये विकण्याची तयारी सुरू केलेली होती व यासाठी त्यांनी बिल्डरला आग्रह धरलेला होता. बिल्डर मोहमद सिद्दीकी यांनी दोन्ही फ्लॅट 1 कोटी 21 लाख रुपयांना विकत घेण्याची तयारी दर्शवली. बिल्डरकडून 1 कोटी 21 लाख रुपये घेतल्यानंतर मात्र संजय बर्वे व त्यांच्या पत्नीने करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यास गेल्या काही महिन्यांपासून टाळाटाळ सुरू केली आहे.

पोलीस आयुक्त संजय बर्वे

मुंबई - मुंबईतील एका प्रतिष्ठित बिल्डरने मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याविरोधात आर्थिक व मानसिक त्रास देण्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संबंधित बिल्डरने एका फ्लॅटखरेदीसंदर्भात बर्वे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला यांच्यावर आर्थिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त बर्वे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण -

मुंबईतील एका बांधकाम प्रकल्पातून दोन फ्लॅट मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व त्यांची पत्नी शर्मिला यांच्या नावावर 2014 मध्ये संजय बर्वे यांनी खरेदी केले होते. या दोन फ्लॅटची किंमत बाजारभावापेक्षा कमी करत तब्बल 1 कोटी 21 लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आलेला होता. मात्र, यासंदर्भात लागणारा टॅक्स बिल्डरने स्वतः भरलेला होता.

हेही वाचा - सांगा मुख्यमंत्री, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; खासदार अमोल कोल्हेंचा सवाल

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी 2014 मध्ये घेतलेले हे दोन फ्लॅट 2018 मध्ये विकण्याची तयारी सुरू केलेली होती व यासाठी त्यांनी बिल्डरला आग्रह धरलेला होता. बिल्डर मोहमद सिद्दीकी यांनी दोन्ही फ्लॅट 1 कोटी 21 लाख रुपयांना विकत घेण्याची तयारी दर्शवली. बिल्डरकडून 1 कोटी 21 लाख रुपये घेतल्यानंतर मात्र संजय बर्वे व त्यांच्या पत्नीने करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यास गेल्या काही महिन्यांपासून टाळाटाळ सुरू केली आहे.

हेही वाचा - काँग्रेसने 70 वर्षांपासून दलितांना निवडणुकांपासून वंचित ठेवले - जे पी नड्डा

त्यामुळे आपला आर्थिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप या बिल्डरने मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत असून 4 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

Intro:मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे हे अडचणीत आलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात मुंबईतील एका प्रतिष्ठित बिल्डरने संजय बर्वे यांच्या विरोधात आर्थिक व मानसिक त्रास देण्याचा आरोप केलेला आहे . मुंबईतील एका बांधकाम प्रकल्पातून दोन फ्लॅट मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व त्यांची पत्नी शर्मिला यांच्या नावावर 2014 मध्ये संजय बर्वे यांनी खरेदी केले होते. या दोन फ्लॅट ची किंमत बाजारभावापेक्षा कमी करीत तब्बल 1 कोटी 21 लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आलेला होता. मात्र या या संदर्भात लागणारा टॅक्स बिल्डरने स्वतः भरलेला होता. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी 2014 मध्ये घेतलेले हे दोन फ्लॅट 2018 मध्ये विकण्याची तयारी सुरू केलेली होती व यासाठी त्यांनी बिल्डरला आग्रह धरलेला होता.Body:बिल्डर मोहमद सिद्दीकी यांनी दोन्ही फ्लॅट 1 कोटी 21 लाख रुपयांना विकत घेण्याची तयारी दर्शवली. बिल्डर कडून 1 कोटी 21 लाख रुपये घेतल्यानंतर मात्र संजय बर्वे व त्यांच्या पत्नीने करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यास गेल्या काही महिन्यांपासून टाळाटाळ सुरू केली आहे . त्यामुळे आपला आर्थिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप या बिल्डरने मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत असून 4 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहेConclusion:
Last Updated : Aug 29, 2019, 9:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.