ETV Bharat / city

शिक्षकांना हक्काची पीएफ रक्कम द्या; भाजपा शिक्षक आघाडीची मागणी

author img

By

Published : Apr 24, 2021, 3:58 PM IST

भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व वित्त सचिवांकडे मागणी केली आहे. दर महिन्याला मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पे युनिटमधून अनेक भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव मंजूर होतात. पण १ एप्रिलपासून एकही भविष्य निर्वाह निधी प्रस्तावाचे बी. डी. एस. जनरेट झाले नाही.

file photo
file photo

मुंबई - कोरोना महामारीने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. दररोज मृत्यूची संख्या वाढत आहे. याला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीही अपवाद नाहीत. आतापर्यंत अनेक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कुटुंबातील सदस्यही मृत्यूशी सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत पैशाची नितांत गरज असते. मात्र त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासन त्यांना देत नाही. त्यामुळे वित्त विभागाने बंद केलेला टॅब सुरू करावा, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने केली आहे.

शिक्षक-शिक्षकेतरांना हक्काचे पैसे द्या -

भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व वित्त सचिवांकडे मागणी केली आहे. दर महिन्याला मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पे युनिटमधून अनेक भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव मंजूर होतात. पण १ एप्रिलपासून एकही भविष्य निर्वाह निधी प्रस्तावाचे बी. डी. एस. जनरेट झाले नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात एकही प्रस्ताव निकाली निघाला नाही. शिक्षकांचा त्यांचा वर्षानुवर्षे जमा केलेला पैसा शासनाच्या धोरणांमुळे मिळत नाही. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आहे. आज बऱ्याच शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पैशाची गरज आहे. त्यात शासनाने भविष्य निर्वाह निधीची टॅब लॉक करून अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे हा टॅब सुरू करून शिक्षकांना त्यांच्या हक्काची पीएफ रक्कम देण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी वित्त विभागाकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.