ETV Bharat / city

प्रवेशाच्या नावाखाली पालकांची फसवणूक; मुंबईतील घक्कादायक प्रकार

author img

By

Published : Jul 14, 2021, 8:51 AM IST

मॅनेजमेंट कोट्यातून महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका तरुणाची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बोरिवली मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलीला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज साठी प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. या प्रवेशासाठी त्यांनी सुशील मिश्रा या नावाच्या व्यक्तीची भेट घेतली व त्यांनी मी तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून मुलीला प्रवेश मिळवून देतो असे सांगितले.

पालकांची फसवणूक
पालकांची फसवणूक

मुंबई - मॅनेजमेंट कोट्यातून महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका तरुणाची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बोरिवली मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलीला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज साठी प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. या प्रवेशासाठी त्यांनी सुशील मिश्रा या नावाच्या व्यक्तीची भेट घेतली व त्यांनी मी तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून मुलीला प्रवेश मिळवून देतो असे सांगितले.

पालकांची फसवणूक

त्यानंतर त्या इसमाने प्रवेश झाला असे सांगून बनावट कागदपत्रं दाखवले. तर काही दिवस ऑनलाईन लेक्चर साठी पासवर्ड आणि आयडी देखील देण्यात आला व कालांतराने तो बंद झाला. त्यांनतर चौकशी केली असता ॲडमिशन झाले नसल्याचे निदर्शनास आले. स्वतःची फसवणूक झाली असल्याची समजताच यासंदर्भात उत्तर मुंबई सायबर सेल यांच्याकडे तक्रार केली. अखेर या प्रकरणात प्राध्यापक सुशील मिश्रा यांची चौकशी करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात; अदानी समूहाकडे आता देशातील ७ विमानतळाची जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.