ETV Bharat / city

ST Employees Strike : वकील गुणरत्न सदावर्ते आल्याशिवाय आम्ही काही बोलणार नाही- संपकरी कर्मचाऱ्यांची भूमिका!

author img

By

Published : Feb 25, 2022, 4:59 PM IST

Updated : Feb 25, 2022, 5:14 PM IST

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप चांगलाच ( ST employees strike ) चिघळला आहे. सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 1, 600 कोटी रुपयांचे ( Economic loss of State Transport ) नुकसान झाले आहे. एसटीच्या 82 हजार 498 कर्मचाऱ्यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही ( ST employees in STtrike ) संपात सहभागी आहेत.

एसटी कर्मचारी आंदोलन
एसटी कर्मचारी आंदोलन

मुंबई- विलीनीकरणाचा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी ( Hearing on ST in high court ) झाली आहे. न्यायालयातील पुढील सुनावणी 11 मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील एसटी कर्मचारी ( ST employees agitation in Azad ground ) आक्रमक झाले आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते आल्याशिवाय आम्ही काही बोलणार नाही, अशी भूमिका संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची घेतली आहे.

गेल्या साडे तीन महिन्यांपासून एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

एसटी कर्मचारी आंदोलन

हेही वाचा-ST Worker Strike : एसटी महामंडळ विलीनीकरणावर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय काय? उच्च न्यायालयात आज सुनावणी

महामंडळाचे तब्बल 1, 600 कोटी रुपयांचे नुकसा
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप चांगलाच ( ST employees strike ) चिघळला आहे. सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 1, 600 कोटी रुपयांचे ( Economic loss of State Transport ) नुकसान झाले आहे. एसटीच्या 82 हजार 498 कर्मचाऱ्यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही ( ST employees in Strike ) संपात सहभागी आहेत.

हेही वाचा-ST workers Agitation : एसटी डेपोला टाळे लावून स्टंटबाजी करणारे गेले कुठे? श्रीरंग बरगे यांची टीका

आज मंत्रीमंडळाची मंजुरी आणा-

गेल्या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीच्या अहवालासह त्यावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिप्राय सीलबंद लिफाफ्यात न्यालयापुढे सादर करण्यात आला होता. पण, मुख्यमंत्र्याच्या अभिप्रायावर त्यांची स्वाक्षरी नसल्याने हा त्यांच्या अभिप्राय आहे का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. आज पुन्हा विलीनीकरणाचा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आधी तीन सदस्यीय समितीच्या अहवालाविषयी निर्णय घ्यावा. त्यानंतर आमच्यासमोर मंत्रिमंडळाचा निर्णय ठेवावा, असे आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 11 मार्चला पुढे ढकलली आहे.

हेही वाचा-ST Workers Strike Update : 250 पैकी 215 डेपो सुरू; एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती

एसटी कर्मचारी आक्रमक-
एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावरून आझाद मैदानावर गेल्या तीन महिन्यापासून संपकरी एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत एसटी विलीनीकरण संदर्भात सुनावणी असल्याने मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी आझाद मैदानावर एकत्र आले आहेत. मात्र न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटीचे कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात येत आहे. याबाबत एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिक्रिया विचारली असता तर वकील गुणरत्न सदावर्ते आल्याशिवाय आम्ही माध्यमांना प्रतिक्रिया देणार नाही, अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Last Updated : Feb 25, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.