ETV Bharat / city

कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्यास ना स्वॅब, ना पोस्टमार्टम; नोंद मात्र कोरोना मृत्यूच्या यादीत

author img

By

Published : Aug 21, 2020, 7:04 PM IST

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे कोणत्याही परिस्थितीत पोस्टमार्टम केले जात नाही. मात्र, त्याचवेळी संशयित रुग्णांचा स्वब घेण्याआधी मृत्यू झाला, तर त्याचा स्व‌ॅब घेतला जात नाही की, त्याचे पोस्ट मार्टम होत नाही. परंतू, त्याची नोंद कोरोना मृत्यूमध्ये होते.

No autopsy or swab test if a covid-19 suspect dies in Mumbai
कोरोना चाचणी

मुंबई - मार्चपासून मुंबईत कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना हा वेगाने पसरणारा आजार असल्याने आणि नवीन आजार असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे कोणत्याही परिस्थितीत पोस्टमार्टम केले जात नाही. मात्र, त्याचवेळी संशयित रुग्णांचा स्वब घेण्याआधी मृत्यू झाला, तर त्याचा स्व‌ॅब घेतला जात नाही की, त्याचे पोस्ट मार्टम होत नाही. परंतू, त्याची नोंद कोरोना मृत्यूमध्ये होते. परिणामी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.

कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्यास ना स्वॅब, ना पोस्टमार्टम; नोंद मात्र कोरोना मृत्यूच्या यादीत

कोरोना रुग्णांवरील उपचारापासून ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत आयसीएमआरने सर्व मार्गदर्शक तत्वे ठरवून दिली आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. या मार्गदर्शक तत्वानुसार संशयित रुग्णांचा स्वब घेण्याआधी मृत्यू झाला, तर त्याचेही पोस्ट मार्टम होत नाही. त्याचा मृत्यूनंतर स्वब घेतला जात नसल्याची माहिती कोविड टास्क फोर्सच्या डेथ कमिटीचे प्रमुख डॉ अविनाश सूपे यांनी दिली आहे. मुळात कोरोना सुरू झाल्यापासून म्हणजेच मार्चपासून मुंबईत पोस्ट मार्टम बऱ्यापैकी बंद आहे.

हेही वाचा - यंदाचा गणेशोत्सव ढोल ताशांविनाच.. कोरोनाच्या विळख्यातून भक्तांना सोडवण्याचे बाप्पाला साकडे

कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांचे पोस्ट मार्टम होत नाहीच. पण त्याचवेळी फक्त फाशी, अपघाती मृत्यू झालेल्यांचेच पोस्ट मार्टम होते. तर एखादा व्यक्ती कोरोना संशयित असेल आणि जर त्याच्या नातेवाईकांनी काही आक्षेप घेत संशय व्यक्त केल्यास मात्र त्याचा स्व‌ॅब घेतला जातो किंवा त्याचे पोस्ट मार्टम होते. पण याचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच आहे. तर हा निर्णय केवळ वरिष्ठ डॉक्टर आणि पोलीसच घेतात, असेही डॉ सुपे यांनी सांगितले आहे.

बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता आणि सायन रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी देखील कोविड संशयित रुग्णांचे पोस्ट मार्टम होत नाही. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांप्रमाणेच त्यांचा मृत देह प्लास्टिक बॅग मध्ये पॅक करत त्याचा अंत्यविधी केला जात असल्याचेही डॉ. डेरे यांनी सांगितले आहे. तर मुंबईत, राज्यात संशयित रुग्णांची नोंद कोरोना मृत्यूमध्ये होत आहे. इतर राज्य मात्र संशयित रुग्णांना कोरोना रुग्णांच्या यादीतून वगळत आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यूचा आकडा कमी असून मुंबई-महाराष्ट्राचा आकडा फुगता आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचा लीलावती रुग्णालयात कोरोना संसर्गाने मृत्यू

आयसीएमआरचे नियम महाराष्ट्र-मुंबई योग्य प्रकारे पाळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान अनेक संशयित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही, हे समजत नसल्याने नातेवाईक मात्र संभ्रमात राहत आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यूनंतरही स्वॅब घ्यावा आणि अहवाल काय तो सांगवा, अशी मागणी सातत्याने नातेवाईकांकडून केली जात आहे. पण सरकार, मुंबई महापालिका मात्र आयसीएमआरच्या नियमाकडेच बोट दाखवताना दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.