ETV Bharat / city

Disha Salian Death Case : राणे पिता-पुत्रांनी पोलिसांकडे हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली

author img

By

Published : Mar 3, 2022, 1:33 PM IST

आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली आहे. ५ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत मालवणी पोलीस ठाण्यात उपस्थित राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ( Disha Salian Death Case )  दिशा सालियन प्रकरणी झालेल्या वक्तव्याबाबत दिशाच्या आईने मालाड पश्चिमच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मालवणी पोलीस स्टेशन
मालवणी पोलीस स्टेशन

मुंबई - आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली आहे. ५ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत मालवणी पोलीस ठाण्यात उपस्थित राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ( Disha Salian Death Case ) दिशा सालियन प्रकरणी झालेल्या वक्तव्याबाबत दिशाच्या आईने मालाड पश्चिमच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मालवणी पोलीस याच प्रकरणाचा तपास करत आहेत.

राणे यांनी पोलिसांत दिलेली नोटीस
राणे यांनी पोलिसांत दिलेली नोटीस

पिता-पुत्र दोघेही ५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात येणार

या तपासांतर्गत ३ आणि ४ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. ( Police summonsed to Narayan Rane ) मात्र, राणे कुटुंबीयांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी पोलीस ठाण्यात पत्र लिहून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे आता राणे पिता-पुत्र दोघेही ५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

हत्या करण्यात आल्याचा दावा

दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, तर भाजपा आमदार नितेश राणे यांना 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केली. ल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात ही कारवाई करण्यात आली.

महिला आयोगाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा अहवालही मागवला होता

दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली, ती गरोदर होती असा नारायण राणेंचा दावा होता. यावरुन ते या प्रकरणात अनेक लोक अडकल्याचा आरोप करत शिवसेनेला टार्गेट करत होते. सालियन कुटुंबियांनी या संदर्भात नुकतीच राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती. महिला आयोगाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा अहवालही मागवला होता. त्या अहवालानुसार तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नाही तसेच मृत्यूच्या वेळी ती गरोदर नव्हती असे म्हटलेलं आहे. या पार्श्वभुमीवर सालियन कुटुंबियांनी राणे पिता पुत्रा विरोधात खोटे आरोप करुन आमची बदनामी करत असल्याची तक्रार केली होती.

दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहेका ?

अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे आत्महत्या प्रकरण देशभर गाजले, त्याच्या आत्महत्येच्या काही दिवसाआधी दिशा सालियान हिचा इमारतीवरुन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या संदर्भात तीची आत्महत्या की खुन असे प्रश्न उपस्थित केले गेले, दिशाच्या आत्महत्येचा तपास सुरु होता. दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहेका हे पण तपासण्यात येत होते. दिशाने आत्महत्या केली नसून तीच्यावर अत्याचार करुन तीला ढकलून मारल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलीस तपासात तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नव्हते, त्यांनी या संदर्भात तसा अहवाल तयार केला आहे.

हेही वाचा - Malik ED Custody End : नवाब मलिक यांची ईडी कोठडी संपली! आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.