ETV Bharat / city

जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ- राऊत

author img

By

Published : Jul 4, 2021, 1:15 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवशेनावरही राऊत यांनी भाष्य केले आहे. तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पलवटवार केला आहे.

Sanjay Raut on Shelar
Sanjay Raut on Shelar

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यामध्ये कोणतीही भेट झाली नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो होतो. पण ते उघडपणे आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच आमच्या भेटीच्या फक्त अफवा असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. पण जेवढ्या तुम्ही अफवा पसरवाल तेवढे अधिक आम्ही एकत्र येऊ," असेही राऊत म्हणाले.

जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ- राऊत

'दोन दिवसांचे असल्याने गोंधळात वाहू देऊ नये'

तसेच, सोमवारपासून विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू होत आहे. यावरही त्यांनी भाष्य केले आहे. त्यापूर्वी अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधी पक्षाने अधिवेशन दोन दिवस पूर्णपणे चालू दिले पाहिजे. विरोधी पक्षाला महाराष्ट्राच्या हिताची काळजी असेल तर ते कामकाज दोन दिवस व्यवस्थितपणे चालू देतील, असेही राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर पलटवार

4 ते 6 महिन्यात महाविकास आघाडी सरकारचे आर्धे मंत्री कोर्टाच्या फेऱ्या मारत असतील किंवा जेलमध्ये असणार आहे. एक डझण मंत्र्यांचे घोटाळे आधिच बाहेर आले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाही यामध्ये समावेश आहे. हे घोटाळेबाज सरकार आधिच पडणार आहे. त्यासाठी आम्ही अफवा पसरवण्याची काहीही गरज नसल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरही सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - परवानगी नसताना सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चास सुरुवात; पोलिसांचा मोठा फौजफाटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.