ETV Bharat / city

Neil Kirit Somayya : नील किरीट सोमय्या यांना सव्वा वर्षात प्राप्त पीएचडी पदवी, शिक्षण वर्तुळात झाला चर्चेचा झाला विषय

author img

By

Published : Oct 13, 2022, 2:14 PM IST

निल किरीट सोमय्या ( Neil Kirit Somayya ) यांनी सिडन्हयाम महाविद्यालयातून ( Sydneham College ) पीएचडी एक ते सव्वा वर्षात प्राप्त केली. याबाबत शिक्षण वर्तुळात मुंबई विद्यापीठाचे ०१ ऑक्टोबर 2022 रोजीचे पत्र व्हायरल होत आहे आणि मुंबई विद्यापीठामध्ये त्याचीच चर्चा आहे जाणून घेऊया सविस्तरपणे

Neil Kirit Somayya
निल किरीट सोमय्या

मुंबई : कोणत्याही व्यक्तीला पीएचडी करायची असेल तर त्यासाठी विशिष्ट पात्रता आधी धारण करावी लागते. सर्वसाधारण विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिनियमानुसार तीन वर्ष पीएचडी साठी कमीत कमी कालावधी लागतो. मात्र निल किरीट सोमय्या यांनी सिडन्हयाम महाविद्यालयातून पीएचडी एक ते सव्वा वर्षात प्राप्त केली. याबाबत शिक्षण वर्तुळात मुंबई विद्यापीठाचे ०१ ऑक्टोबर 2022 रोजीचे पत्र व्हायरल होत आहे आणि मुंबई विद्यापीठामध्ये त्याचीच चर्चा आहे जाणून घेऊया सविस्तरपणे.


सिडनहॅम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज मुंबई : ०१ ऑक्टोबर 2022 च्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रात उल्लेख आहे.निल किरीट सोमय्या यांनी 17 ऑगस्ट 2022 या तारखेला आपला पीएचडीचा प्रबंध सादर केला. यासाठीची नोंदणी एक जून 2019 जून रोजी केल्याचं त्यात नमूद आहे. निल किरीट सोमय्या यांनी ही पदवी सिडनहॅम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज मुंबई या महाविद्यालयातून पीएचडी केलेली आहे. त्यांचा विषय देखील मॅनेजमेंट स्टडीज अर्थात व्यवस्थापन अध्ययन असा आहे. मात्र सव्वा वर्षात पदवी कशी काय प्राप्त होऊ शकते. असं पत्र पाहून कोणालाही शंका येऊ शकते यासंदर्भात अनेक जाणकारांकडून देखील प्रश्न उपस्थित झाला.


विद्यापीठाचा खुलासा : मात्र सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निर्णय कसा करावा म्हणून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक प्रसाद कारंडे यांच्याशी ईटीवी भारतने संवाद साधला त्यांनी या संवादाच्या दरम्यान माहिती विशद केली की, 2017 या वर्षी नील किरीट सोमय्या यांनी पी एच डी साठी नोंदणी केलेली होती. त्यामुळे 2017 ते 2022 हा कालावधी पीएचडीसाठीचा पुरेसा आहे. मात्र 2021 मध्ये जी नोंदणी केलेली आहे. ती नोंदणी नेमकी काय आहे. जे त्याबाबतीत पत्र सध्या व्हायरल होत आहे. ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल प्रसाद कारंडे यांनी खुलासा केला की, 2021 मध्ये नील किरीट सोमय्या यांनी मूळ पीएचडीच्या विषयांमध्ये थोडी दुरुस्ती केली. पीएचडीसाठी विषयाची दुरुस्ती नियमानुसारच आहे आणि विषयाची दुरुस्ती नमूद करत असताना त्याची तारीख इत्यादी सर्व इत्यंभूतपणे नमूद करावे लागते.

Neil Kirit Somayya
निल किरीट सोमय्या

2017 पासून त्यांनी नोंदणी केली : 01 ऑक्टोबर 2022 च्या विद्यापीठाच्या पत्रात निल किरीट सोमय्या यांच्या पीएचडीच्या मुळ विषयात जरा दुरुस्ती केली म्हणून ज्या तारखेला दुरुस्ती केली. त्यावेळची तारीख नियमानुसार नोंदवावी लागते. यामुळे त्यात तो उल्लेख 2021 चा येणे क्रमप्राप्त आहे. 2017 च्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार विषयाची दुरुस्ती करता येते. त्यामुळे निल किरीट सोमय्या यांची पदवी सव्वा वर्षात नव्हे तर 2017 पासून त्यांनी नोंदणी केली होती आणि 2022 मध्ये त्यांना पीएचडीची पदवी मिळालेली आहे.



शिवसेना सिनेट सदस्य म्हणाले सखोल माहिती घेऊ मग बोलू. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे शिवसेनेचे आणि सिनेट मेंबर असलेले प्रदीप सावंत यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, या संदर्भात आम्ही अभ्यास करत आहोत. आम्ही खोलवर माहिती घेऊन याबाबत नंतर अधिक ठोसपणे आपल्याशी बोलू.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.