ETV Bharat / city

मोदीजी, आता तुम्हीच सांगा कोणत्या चौकात शिक्षा द्यायची - नवाब मलिक

author img

By

Published : Nov 8, 2021, 11:21 AM IST

नोटाबंदीवरून अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. नोटबंदीमुळे फायदा झाला नाही. तर देशातल्या जनतेने मला चौकात शिक्षा द्यावी, असं पंतप्रधान म्हणाले होते. मात्र, आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. नोटबंदी मुळे कोणताही फायदा झाला नाही. मग आता पंतप्रधानांना कोणत्या चौकात शिक्षा द्यावी, असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला.

Ncp Leader Nawab Malik Taunts Pm Narendra Modi over Note Ban
मोदीजी, आता तुम्हीच सांगा कोणत्या चौकात शिक्षा द्यायची - नवाब मलिक

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली होती. त्याला आज 5 वर्षे पूर्ण झाली. यावर आज अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. नोटबंदीमुळे फायदा झाला नाही. तर देशातल्या जनतेने मला चौकात शिक्षा द्यावी, असं पंतप्रधान म्हणाले होते. मात्र, आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. नोटबंदी मुळे कोणताही फायदा झाला नाही. मग आता पंतप्रधानांना कोणत्या चौकात शिक्षा द्यावी, असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला.

पंतप्रधानांना कोणत्या चौकात शिक्षा द्यावी -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत. नोटबंदीमुळे देशातला भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपेल. देशात काळा पैसा राहणार नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. तसेच केवळ तीन महिन्यांमध्ये नोटबंदीबाबत पंतप्रधानांनी देशातील जनतेकडे वेळ मागितला होता. नोटबंदीमुळे फायदा झाला नाही. तर देशातल्या जनतेने मला चौकात शिक्षा द्यावी, असं पंतप्रधान म्हणाले होते. मात्र, आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. नोट बंदी मुळे कोणताही फायदा झाला नाही. मग आता पंतप्रधानांना कोणत्या चौकात शिक्षा द्यावी, अशी टीका नवाब मलिक यांनी मोदींवर केली.

काय म्हणाले होते पंतप्रधान?

पंतप्रधान मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. तेव्हा भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल, काळा पैसा परत आणू अशी अनेक आश्वासने दिली. नोटबंदीमुळं त्यावेळी देशभरातील नागरिकांना मोठा त्रास झाला. नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर रांगा लागल्या. त्यात काही जणांचा मृत्यूही झाला. मात्र, भाजपकडून या निर्णयाचं समर्थन केलं जात होतं. 'मला फक्त तीन महिने द्या. माझा हा निर्णय चुकला तर कुठल्याही चौकात मला बोलवा आणि देश जी शिक्षा देईल, ती भोगायला तयार आहे,' असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

नोटाबंदीची 5 वर्षे -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय चलनातून जुन्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे काळा पैसा भारतीय अर्थव्यवस्थेतील बाद होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. मात्र, याच्या प्रत्यक्ष उलटे झाले. बाद केलेल्या जुन्या नोटांपैकी तब्बल 99 टक्के नोटा या बँकेत परत आल्या. मोदी यांच्या या निर्णयामुळे अनेक महिने चलन तुटवडा निर्माण झाला होता. अनेक व्यवहार ठप्प झाले होते. त्यांच्या या निर्णयाचे परिणाम आजही काही उद्योगांना भोगावे लागत आहेत. तर देशभरात सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. 2016 मध्ये भाजपा सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारांची संख्या वाढली असून असंघटित क्षेत्र क्षीण होत आहे, असे माजी पंतप्रधान आणि जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.