ETV Bharat / city

ड्रग्ज प्रकरण : चित्रपट दिग्दर्शक करण जोहरला एनसीबीकडून समन्स

author img

By

Published : Dec 17, 2020, 8:43 PM IST

Updated : Dec 17, 2020, 10:34 PM IST

karan
karan

20:29 December 17

करण जोहरला एनसीबीकडून नोटीस देण्यात आली आहे. हजर न राहता कागदपत्रे देण्याबाबतची ही नोटीस आहे.

मुंबई -  चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्ज प्रकरणी करण जोहरला समन्स बजावला आहे. हजर न राहता कागदपत्रे देण्याबाबतची ही नोटीस आहे. काही व्हिडिओ आणि तांत्रिक पुरावेदेखील जोहरला एनसीबीकडे द्यावे लागणार आहेत. तसेच एनसीबीने मागवलेले साहित्य प्रतिनिधीमार्फत पाठवण्याची मूभा करण जोहरला एनसीबीकडून देण्यात आली आहे.  उद्यापर्यंत पुर्तता करण्याची नोटीस देण्यात आली आहे. मंजिंदर सिरसा यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.  

जूनमध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अंमली पदार्थ आणि बॉलिवूड सेलिब्रिटींमधील कथित संबंधांबद्दल चौकशी करण्यासाठी एनसीबीने २८ ऑक्टोबरला करिश्मा प्रकाश हिला बोलावले होते. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीसमोर दीपिका, अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनी यापूर्वीच त्यांचे जबाब नोंदवले आहेत.

काय आहे प्रकरण?

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा एक्झिक्युटिव प्रोड्युसर क्षितिज प्रसाद आणि असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडा यांची एनसीबीकडून चौकशी झाली. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या अंकुश अरेंजा या आरोपीचे या दोन्ही व्यक्तींसोबत जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. एका कार्यक्रमाच्या फोटोत क्षितिज प्रसाद, अनुभव चोपडा हा अमली पदार्थ तस्करी अंकुश अरेंजा याच्यासोबत दिसला आहे.

क्षितिज प्रसादच्या घरी ज्यावेळेस कुठली पार्टी व्हायची, त्या वेळेस ड्रग पेडलर अंकुश अरेंजा हासुद्धा या पार्टीमध्ये यायचा. ही पार्टी मुंबईत असेल किंवा दिल्लीत असेल प्रत्येक ठिकाणी अंकुश अरेंजा या पार्टीमध्ये सहभागी असायचा, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. क्षितिज प्रसाद व अनुभव चोपडा हे दोघेही निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांचे जवळचे सहकारी असल्याचे एनसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

करण जोहरच्या घरातील पार्टीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या घरी आयोजित एका पार्टीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात ड्रग्जचा वापर झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे, बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचे सिंडिकेट हे कुठपर्यंत पसरलेले आहे आणि यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास एनसीबीच्या पथकाकडून केला जात आहे. 

Last Updated : Dec 17, 2020, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.