ETV Bharat / city

...त्यावेळी राऊत शिवसेनेत तरी होते का?, नारायण राणे यांचा संजय राऊतांवर निशाणा

author img

By

Published : Jun 19, 2021, 9:12 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंगावर आले तर शिंगावर घेवू असा इशारा भाजपाला दिला होता. त्याला भाजपा खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत काय शिंगावर घेणार? त्यांना शिंगं तरी आहेत कुठे असा खोचक टोला नारायण राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नारायण राणे
नारायण राणे

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंगावर आले तर शिंगावर घेवू असा इशारा भाजपाला दिला होता. त्याला भाजपा खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत काय शिंगावर घेणार? त्यांना शिंग तरी आहेत कुठे असा खोचक टोला नारायण राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या वेळी त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आताची शिवसेना ही बिन शिंगाची शिवसेना आहे. आता फटके देणारी शिवसेना राहिली नाही, ही केवळ पैसे जमवणारी शिवसेना आहे.अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान शिवसेना भवनासमोर भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला होता. त्यावरही नारायण राणे यांनी टीका केली, मुख्यमंत्री हेच करणार त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा आहे. त्यांच्याकडे काही वैचारिकता आहे का? भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करतात. महिलांवर हल्ला करणाऱ्यांचं कौतुक करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशा शद्बात नारायण राणे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला.

संजय राऊत सेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये - राणे

शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन, संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. ज्यांनी कधी कोणाच्या कानशिलात लगावली नाही त्यांनी धमकीची भाषा करू नये. संजय राऊत नेमके शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये असा सवालही राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

तुम्ही शिवसेना वाढीसाठी काय केलं?

शिवसेना भवनाचा इतिहास राऊतांना काय माहित आहे? त्यावेळी शिवसेनेत तरी होते का ते? तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये काम करत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत होते, त्यावेळचे अंक माझ्याकडे आहेत. तुम्ही शिवसेनाप्रमुखांवर कोणत्या भाषेत टीका केली ते प्रहारमध्ये छापू का? असा इशाराही यावेळी खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी स्वतः वर्गणी दिली आणि तेव्हा शिवसेना भवन उभा राहिलं. तुमच योगदान तरी काय? तुम्ही नोकरीला आलात तुम्ही कधी शिवसैनिक आणि नेता झालात हे सांगणार नाही. तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काय केलं? असा सवालही नारायण राणे यांनी केला.

शिवसेना -भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

दरम्यान शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळमधील पेट्रोल पंपावर 100 रुपयात दोन लिटर पेट्रोल देण्यात येणार होतं. त्याचबरोबर भाजपाचे सदस्य असल्याचे ओळखपत्र दाखवल्यास त्यांना एक लिटर मोफत पेट्रोल देण्यात येईल अशी घोषणाही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. अकरा वाजता आमदार वैभव नाईक पेट्रोल पंपावर दाखल झाले, मात्र त्या आधीच तिथे भाजपाचे कार्यकर्ते हजर होते. भाजपा कार्यकर्ते व आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोनही पक्षांचे कार्यकर्ते एकोंएकांना भिडले. यावर देखील नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये प्रतिक्रिया दिली. वैभव नाईक यांनी काही हल्ला कोला नाही, तुमच्याकडे फुटेज असेल तर पहा ते पळून गेले असं नारायण राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - पर्यटनला जाण्याचा विचार करताय, तर ही बातमी अवश्य वाचा.. सरकार काढणार नवा आदेश !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.