ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत आज कोरोनाच्या नवीन २०३ रुग्णांची नोंद तर कोरोनाने मुंबईत दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 14, 2022, 8:37 PM IST

मुंबईत आज २०३ रुग्णांची नोंद झाली आहे (Mumbai Corona Update). कोरोनाने मुंबईत दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४६१ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे (Mumbai Corona Update). हा प्रसार कमी झाला असून आज २०३ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाने मुंबईत दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४६१ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत २०३ नवे कोरोना रुग्ण - मुंबईत आज १४ सप्टेंबरला ९२८१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २०३ रुग्णांची नोंद झाली. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. ३१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४८ हजार ५०२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २७ हजार ३२० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४६१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३५३१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२० टक्के इतका आहे.


रुग्णसंख्या घटतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४,
४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६, ८ सप्टेंबरला २९०, ९ सप्टेंबरला २५१, १० सप्टेंबरला २०९, ११ सप्टेंबरला १८७, १२ सप्टेंबरला १२८, १३ सप्टेंबरला १९३, १५ सप्टेंबरला २०३ रुग्णांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.