ETV Bharat / city

Mumbai Corona : मुंबईतील सक्रिय रुग्णांत वाढ; तर रुग्ण दुपटीचा कालावधी घसरतोय

author img

By

Published : Apr 17, 2022, 3:48 PM IST

मुंबई मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या आटोक्यात आली ( Mumbai Corona ) होती. मात्र, आता सक्रिय रुग्णांची संख्या वाढली ( Mumbai Corona Active Cases Increased ) आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होत ( Mumbai Corona Doubling Time ) आहे.

Mumbai Corona
Mumbai Corona

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( Mumbai Corona ) आहे. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा थोपवण्यात व कोरोनाचा प्रसार रोखण्यात मुंबई महापालिका प्रशासन व राज्य सरकारला यश आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली ( Mumbai Corona Active Cases Increased ) आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊ लागला ( Mumbai Corona Doubling Time ) आहे. यामुळे मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे का?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

असा वाढला होता रुग्ण दुपाटीचा कालावधी - मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या असून, त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तिसऱ्या लाटेआधी १ डिसेंबरला मुंबईमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक २७८० दिवस इतका नोंदवला होता. जानेवारी २०२२ मध्ये ६ ते ८ तारखेला दिवसाला २० हजार रुग्णांची नोंद झाली. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी घसरून ११ जानेवारीला ३६ दिवसांवर आला होता. कोरोना विषाणूचा प्रसार सध्या आटोक्यात असल्याने दिवसाला १०० हुन कमी रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे १७ मार्चला रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून १५,९३३ दिवस इतका नोंदवण्यात आला. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक २७८० दिवस इतका रुग्ण दुपटीचा कालावधी नोंदवला होता.

सक्रिय रुग्ण वाढले, रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला - मुंबईत १ फेब्रुवारी रोजी ८०३ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी ८,८८८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी ४८५ दिवस रुग्ण दुपटीचा कालावधी नोंदवला होता. १ मार्चला ७७ नवे रुग्ण आढळून आले. त्यावेळी ७५७ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. ५२७९ दिवस रुग्ण दुपटीचा कालावधी होता. ८ एप्रिलला ४९ नवे रुग्ण आढळून आले. तेव्हा २९९ सक्रिय रुग्णांची नोंद होऊन १८०८७ दिवसांवर रुग्ण दुपटीचा कालावधी नोंदवला होता. त्यानंतर १५ एप्रिलला ४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यावेळी ३४१ सक्रिय रुग्ण आढळून आले, तर १४९६० दिवस रुग्ण दुपटीचा कालावधी नोंदवला गेला. १६ एप्रिलला ४३ नवे रुग्ण, ३२९ सक्रिय रुग्ण १५१८७ दिवस रुग्ण दुपटीचा कालावधी नोंदवला गेला आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असताना रुग्ण दुपटीचा कालावधी घसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

वेट अँड वॉच - रुग्णसंख्या कमी झाल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतो. रुग्णसंख्या वाढल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होतो. डिसेंबरमध्ये आलेली तिसरी लाट महिनाभरात आटोक्यात आली. त्यानंतर दोन महिने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबईत सध्या निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे पुढील काही दिवस रुग्णसंख्या वाढते का यावर लक्ष ठेवून आहोत. सध्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत नाही. रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णालये आणि कोविड सेंटर सज्ज ठेवली आहेत, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - Maharashtra Power Crisis : गुजरात मधून वीज खरेदी, राज्य लवकरच भारनियमन मुक्त - ऊर्जामंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.