ETV Bharat / city

Minister Balasaheb Thorat : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उत्तम काम सुरु, यापुढेही करत राहू'

author img

By

Published : Apr 11, 2022, 3:22 PM IST

महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government ) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वात काम करत आहे. गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केले आहे. तसेच यापुढेही त्यांच्या नेतृत्वात काम करत राहू, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी दिले आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात
मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई - काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर ( Women and Child Development Minister Yashomati Thakur ) यांनी अमरावतीमध्ये 10 एप्रिल रोजी झालेल्या एका कार्यक्रमात 'राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government ) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वात काम करत आहे. गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केले आहे. तसेच यापुढेही त्यांच्या नेतृत्वात काम करत राहू, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी दिले आहे.

गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केले आहे. यानंतरही चांगले काम होत राहील. शरद पवार हे देशातले मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत असलेल्या आदरामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असेल. मात्र महाविकास आघाडी सरकार तीन पक्षात आहे. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत राहील, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.


'शरद पवार देशाचे मोठे नेते' : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे असलेल्या एका कार्यक्रमात यशोमती ठाकुर आणि बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांची भेट या दोन्ही नेत्यांनी घेतली. शरद पवार हे देशातले मोठे नेते आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नेहमीच आपण त्यांची भेट घेत असतो. यावेळी राज्यासमोर ऊस गाळपाचा मुद्दा आणि सहकार विषयावर चर्चा झाली असल्याचाही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा - Yashomati Thakur Amravati : शरद पवार मुख्यमंत्री असते, तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते - यशोमती ठाकुर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.