ETV Bharat / city

Chandigarh Commissioner Anindita Mitra : 'मुंबईच्या धर्तीवर चंदीगडमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कचरा व्यवस्थापन राबविणार'

author img

By

Published : Apr 21, 2022, 8:54 PM IST

अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित घनकचरा व्यवस्थापन केले जाईल, असे आयुक्त अनिंदिता मित्रा ( Commissioner Anindita Mitra ) यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ( Solid Waste Management Department of Mumbai Municipal Corporation ) विभागाच्या विविध प्रकल्पांना भेट दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह ( Commissioner Dr Iqbal Singh Chahal ) यांच्याशी संवाद साधताना बोलत होत्या.

माहिती घेताना चंदीगडच्या महापौर
माहिती घेताना चंदीगडच्या महापौर

मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे राबविण्यात येत असलेले विविध प्रकल्प हे चंदीगड सारख्या शहरांना निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत, असे कौतुकोद्गार चंदीगडच्या महापौर सर्बजीत कौर ( Chandigarh Mayor Sarbajit Kaur ) यांनी काढले. तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित घनकचरा व्यवस्थापन केले जाईल, असे आयुक्त अनिंदिता मित्रा ( Commissioner Anindita Mitra ) यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ( Solid Waste Management Department of Mumbai Municipal Corporation ) विभागाच्या विविध प्रकल्पांना भेट दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह ( Commissioner Dr Iqbal Singh Chahal ) यांच्याशी संवाद साधताना बोलत होत्या.

चंदीगडमध्येही व्यवस्थापन : मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी चंदीगड महापालिकेच्या महापौर, आयुक्त यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या कामकाजाची व नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती दिली. याप्रसंगी बृहन्मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जाते. त्याच धर्तीवर आता चंदीगड महापालिकेत देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित घनकचरा व्यवस्थापन लवकरच साध्य केले जाणार आहे, असे चंदीगड महापालिकेच्या आयुक्त अनिंदिता मित्रा यांनी नमूद केले.


डम्पिंग ग्राउंडला दिली भेट : चंदीगड महापालिकेच्या महापौर सर्बजीत कौर, अनुप गुप्ता, चंदीगडच्या महापालिका आयुक्त अनिंदता मित्रा, प्रमुख अभियंता एन. पी. शर्मा यांनी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, कच-यापासून खत निर्मिती, कचरा व्यवस्थापनात अत्याधुनिक व संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर इत्यादी बाबींची माहिती घेतली. यानंतर मुलुंड येथील क्षेपणभूमी येथे प्रगतीपथावर असलेल्या 'बायोमायनिंग' प्रकल्पास भेट देऊन तेथील कामांची माहिती घेतली.

हेही वाचा - Load shading in Maharashtra : जयंत पाटलांच्या कोल्हापूरच्या कार्यक्रमात चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित; उर्जामंत्र्यांचा दावा फोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.