ETV Bharat / city

विशेष बातमी : मुंबईत बालकांचा जन्मदर व प्रसूतीदरम्यान मातांच्या मृत्यूचा दर घसरला

author img

By

Published : Jul 15, 2022, 10:17 PM IST

मुंबईमध्ये २०१७ च्या तुलनेत २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीत बालकांचा जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला आहे. त्याच प्रमाणे मृत्यू दरातही घट झाली आहे. प्रसूती दरम्यान होणाऱ्या मातांच्या मृत्यूमध्येही घट झाली आहे.

file photo
फाईल फोटो

मुंबई - मुंबईमध्ये २०१७ च्या तुलनेत २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीत बालकांचा जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला आहे. त्याच प्रमाणे मृत्यू दरातही घट झाली आहे. प्रसूती दरम्यान होणाऱ्या मातांच्या मृत्यूमध्येही घट झाली आहे. यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SGD) नॅशनल एमएमआर टार्गेटनुसार २०३० पर्यंत मृत्युदराचे टार्गेट गाठणे सहज शक्य असल्याचे प्रजा फाऊंडेशन या एनजीओने मुंबई महापालिका प्रशस्तीपत्र दिले आहे.

जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला - मुंबईमध्ये २०१७ मध्ये १ लाख ५५ हजार ३८८ बालकांचे जन्म झाले. त्यावेळी जन्मदर १२.२० टक्के होता. २०१८ मध्ये १ लाख ५१ हजार १८७ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ११.८३ टक्के जन्मदर होता. २०१९ मध्ये १ लाख ४८ हजर ८९८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी जन्मदर ११.६१ टक्के इतका होता. २०२० मध्ये १ लाख २० हजार १८८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ९.३३ टक्के इतका जन्मदर होता. २०२१ मध्ये १ लाख १३ हजार ७७८ बालकांचा जन्म झाला. त्यावेळी ८.८१ टक्के इतका जन्मदर नोंदवला गेला. २०१७ च्या तुलनेत २०२१ मध्ये जन्मदर ३६ टक्क्यांनी घसरला आहे.

बालकांचा मृत्यू दर घटतोय- जन्म झाल्यावर २८ दिवसात २०१७ मध्ये २५६३, २०१८ मध्ये २२३९, २०१९ मध्ये २१८६, २०२० मध्ये १८५८ तर २०२१ मध्ये १६७५ बालकांचा मृत्यू झाला. जन्म झाल्यावर २८ दिवसात २०१७ मध्ये १६.४९ टक्के, २०१८ मध्ये १४.८१ टक्के, २०१९ मध्ये १४.६८ टक्के, २०२० मध्ये १५.४६ टक्के तर २०२१ मध्ये १४.७२ टक्के मृत्युदर नोंद झाला आहे. जन्म झाल्यावर १ वर्षात २०१७ मध्ये ४०७९, २०१८ मध्ये ३७२३, २०१९ मध्ये ३४३०, २०२० मध्ये २६४९ तर २०२१ मध्ये २६०१ बालकांचा मृत्यू झाला. जन्म झाल्यावर १ वर्षात मृत्यू होणाऱ्या बालकांचा २०१७ मध्ये २६.२५ टक्के, २०१८ मध्ये २४.६३ टक्के, २०१९ मध्ये २३.०४ टक्के, २०२० मध्ये २२.०४ टक्के तर २०२१ मध्ये २२.८६ टक्के मृत्युदर नोंद झाला आहे. जन्म झाल्यावर ५ वर्षात २०१७ मध्ये ५०२०, २०१८ मध्ये ४५२९, २०१९ मध्ये ४२२१, २०२० मध्ये ३१२३ तर २०२१ मध्ये ३२८० बालकांचा मृत्यू झाला. जन्म झाल्यावर ५ वर्षात मृत्यू होणाऱ्या बालकांचा २०१७ मध्ये ३२.३१ टक्के, २०१८ मध्ये २९.९६ टक्के, २०१९ मध्ये २८.३५ टक्के, २०२० मध्ये २५.९८ टक्के तर २०२१ मध्ये २८.८२ टक्के मृत्युदर नोंद झाला आहे.

प्रसूतीवेळी मतांच्या मृत्यूमध्ये घट - प्रसूतीवेळी मातांचे मृत्यू होतात. २०१७ मध्ये २३६, २०१८ मध्ये २१८, २०१९ मध्ये २५७, २०२० मध्ये १९७ तर २०२१ मध्ये ९५ प्रसूतीवेळी मतांचा मृत्यू झाला. १ लाख लोकसंख्येच्या तुलनेत २०१७ मध्ये १५२, २०१८ मध्ये १४४, २०१९ मध्ये १७३, २०२० मध्ये १६४ तर २०२१ मध्ये ८३ मातांची प्रसूतीदरम्यान मृत्युची नोंद झाली आहे.

टार्गेटपर्यंत पोहचणे शक्य - २०१७ च्या तुलनेत २०२१ पर्यंत बालकांच्या जन्म दरात ३६ टक्क्यांनी घट झाली आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SGD) नॅशनल एमएमआर टार्गेटनुसार २०३० पर्यंत मातांचा मृत्युदर ७० पर्यंत आणावा लागणार आहे. सध्या मुंबईमधील माता मृत्युदर २०२१ मध्ये ८३ वर आला आहे. यामुळे सहज शक्य आहे. तसेच ५ वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर ११ असणे गरजेचे आहे. त्यात वाढ होऊन २०२० मध्ये २६ तर २०२१ मध्ये २९ नोंद झाला आहे अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी दिली.

कोरोनामुळे जन्मदर घसरला - मुंबईमध्ये प्रसूती दरम्यान अडचणी निर्माण झाल्यास शेवटच्या क्षणी खासगी रुग्णालय आणि नर्सिंग होम मधून गरोदर महिलांना पालिका रुग्णालयात पाठवले जाते. यामुळे मृत्यूचे प्रकार घडतात. पालिका रुग्णालयात चांगल्या सुविधा दिल्या जातात. कोरोनामुळे कालावधीत जन्म घेणाऱ्या आपल्या बालकावर परिणाम होईल अशीही भीती नागरिकांना होती. यामुळे अनेक कुटूंबानी फॅमिली प्लॅनिंग केल्याने जन्मदर घसरल्याची अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.