ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING : विधानसभेचे विद्यापीठ हरपले.. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन

author img

By

Published : Jul 30, 2021, 7:02 AM IST

Updated : Jul 30, 2021, 10:38 PM IST

maharashtra
maha breaking

22:37 July 30

विधानसभेचे विद्यापीठ हरपले.. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन

सोलापूर - शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षाचे होते. गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांनी सांगोला मतदारसंघाचे 55 वर्षे प्रतिनिधीत्व केले. सर्वाधिक काळ आमदार राहण्याचा विक्रम देशमुख यांच्या नावावर आहे.

20:37 July 30

परमबीर सिंग यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा, केतन तन्ना यांच्यासह सोनु जलान आणि रियाज भाटी यांचा जबाब

ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबईत एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे परमबीर सिंग यांच्यावर दाखल आहेत.  केतन तन्ना यांच्यासह सोनु जलान आणि रियाज भाटी यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आज तिघांचा ठाणे पोलिसांनी जवाब नोंदवून परमबीर सिंग यांच्या विरोधात  गुन्हा दाखल केला. संपुर्ण प्रकरणात एकूण २८ जणांची नावे आहेत. त्यात  ८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश तर कुख्यात गुंड रवी पुजारी याचे देखील आहे.  परमबीर सिंग आणि इतर जणांवर जबरी चोरी, धमकावणे,  खंडणी यांसारखे दहाहून अधिक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तत्कालीन ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, एसीपी एन.टी. कदम तसेच दोन पोलीस शिपाई यांच्यासह इतर लोकांवर गुन्हा दाखल आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात केतन तन्ना यांच्यासह सोनु जलान, रियाज भाटी यांचा  संघर्ष सुरु होता.

20:37 July 30

पेट्रोल के दाम कम हुये के नही हुये.. .यावर नाही म्हणत वर्ध्यात सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध

वर्धा - वर्ध्याच्या आर्वी मतदार संघाचे माजी आमदारांच्या नेतृत्वात वाढत्या माहगात विरोधात 45 किलोमीटर सायकल यात्रा  काढण्यात आली. पंतप्रधान मोदीच्या भाषणातील ऑडिओ पेट्रोल के दाम कम हुये के नही हुये...यावर नाही म्हणत ही रॅली काढून लक्ष वेधण्यात आले.  यावेळी मोठ्या संख्येने युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. कारंजा येथून सायकल यात्रा काढत आर्वीला पोहचली. पेट्रोल डिझेल, वाढत्या महागाईने समान्य माणसाचे कंबरडे मोडल्याची परिस्थिती मांडण्यात आली.

18:43 July 30

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना ईडीचे समन्स

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स जारी केले आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

17:21 July 30

डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे - डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.  ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी ही घोषणा केली आहे.

16:57 July 30

..असं सांगणं म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा, शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावलं

मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टी चे पती आणि व्यवसायिक राज कुंद्रा अटकेत आहे. दरम्यान याच काळात शिल्पा शेट्टी तसंच राज कुंद्रा यांच्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्या. प्रसारमाध्यमांमध्ये येणार्या बातम्यांच्या विरोधात शिल्पा शेट्टी कोर्टात याचिका दाखल केली. यावेळी शिल्पा शेट्टी यांच्या वकिलांना न्यायालयाने काही प्रश्न विचारले निरीक्षणे नोंदवली.प्रसारमाध्यमांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा प्रकरणात झालेल्या चौकशीविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या असतील तर त्याविषयी बदनामीचा दावा कसा होऊ शकतो?,' असा प्रश्न न्यायालयानं शिल्पा शेट्टीचे वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यापुढं उपस्थित केला.

16:52 July 30

पूरग्रस्तांच्या मदतीत राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहन

कोल्हापूर - गेल्या काही वर्षात आपण वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देत आहोत. आपली प्राथमिकता ही लोकांचे जीव वाचवणे ही आहे. महापुरानंतर रोगराई होण्याची शक्यता आहे. हे अस्मानी संकट भयानक असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी आहे. पुराच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. पूर बाधित नागरिकांचं पुनर्वसन करणे आवश्यक आहे. यासाठी राजकारण नको असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

16:48 July 30

पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई - पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही  राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.  5 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. परमबीर सिंग यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपात पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणीने हायकोर्टाने भूमिका मांडली आहे.  

16:48 July 30

गुन्हा रद्द करण्यासाठी डीसीपी अकबर पठाण यांची हायकोर्टात याचिका

मुंबई - कोणतीही चौकशी न करता सरकारी अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हा दाखल करता येत नसल्याचा,  दावा डीसीपी अकबर पठाण यांनी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने याप्रकरणी विशेष सरकारी वकील नियुक्त केल्याने त्याला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. परमबीर सिंग यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपात पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

15:20 July 30

वीज बिल वसुली करा; पण इंग्रजांसारखे वागू नका, यशोमती ठाकूरांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम

अमरावती - वीज बिल वसुली करा, पण इंग्रजां सारखे वागू नका, वीज बिल वसुली करताना दादागिरी करू नका, असा सज्जड दम मंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. सध्या शेतकरी संकटात आहे. त्याला तगादा लावू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.  

14:12 July 30

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

ठाणे नगर पोलीस ठाण्यात केतन तन्ना आणि सोनू जलाल यांच्याकडून जबाब नोंदविण्याचे कार्य सुरू

धमकावल्याचा आणि करोडो रुपये वसूल केल्याच्या आरोपावरून परमविर सिंह  आणि प्रदीप शर्मा टीमच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

केतन तन्नाचा गुरुवारी जबाब नोंदविल्यानंतर केतन तन्ना आज पुन्हा कुटुंबासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल

पोलिसांकडून जबाब नोंदवण्याचे  कार्य सुरू

12:28 July 30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय पूरग्रस्त निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट व पद्माराजे विद्यालयातील निवारा केंद्रात पूरग्रस्त जनतेशी संवाद.....

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, शिरोळ चे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

10:24 July 30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा देखील आज कोल्हापुरात पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. त्यांच्या सोबत प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक पाहणी दौऱ्यावर आहेत. 

10:21 July 30

मुख्यमंत्री ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यात, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर - पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री ठाकरे आज कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 09.45  वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे स्वागत केले.

---------------------------

09:24 July 30

राष्ट्रीय महामार्ग 6 वर भीषण अपघात तिघे जागीच ठार, एक गंभीर...

वर्धा - नागपूर अमरावती या राष्ट्रीय महामार्ग 6 वर  कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अमरावतीहून अमरावतीहुन नागपूरकडे जाणारी भरधाव कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला आहे.  चिस्तुर गावाजवळ हा अपघात झाला आहे.

-

08:19 July 30

वनाज ते आडियल कॉलनी मार्गावर धावली पुणे मेट्रो

 पुणे - पुणेकरांसाठी मेट्रो लवकरच रुळावर धावणार आहे. आज मेट्रोच्या प्रथम ट्रायल रनला उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. वनाज ते आयडियल कॉलनी या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे.

06:59 July 30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

06:53 July 30

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना ईडीचे समन्स

धावपटू अविनाश साबळेने आपलाच ८.२०.२० चा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. ८.१८.१२ च्या वेळेसह ३००० मी स्टीपलचेस हीट मध्ये राहिला ७ व्या स्थानी. मात्र, अंतिम फेरीत जाण्यासाठी ही विक्रमी वेळ उपयोगी पडली नाही. तो अंतिम फेरीसाठी अपात्र ठरला आहे. 

Last Updated : Jul 30, 2021, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.