ETV Bharat / city

राज्यात पश्चिमेकडे वाहणारे पाणी पूर्व भागात वळवणार!

author img

By

Published : Jan 11, 2020, 11:02 PM IST

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमेकडे वाहत जाणारे पाणी पूर्वेला कसे वळवता येईल, याबाबत जलसंपदा विभागाकडून आढावा घेण्यात आला. यावेळी मराठवाड्याला अधिक पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत असल्याचे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले.

Review meeting of Maharashtra Water Resources Department
महाराष्ट्र जलसंपदा विभागाची आढावा बैठक

मुंबई - महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमेकडे वाहत जाणारे पाणी पूर्वेला कसे वळवता येईल, याबाबत आज शनिवारी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या प्रयोगासाठी काय उपाययोजना करता येईल, कसा प्रकारे त्याला गती देता येईल, याबाबत चर्चा झाली. या बैठकीला माजी कृषीमंत्री शरद पवार हे देखील उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'कोट्यवधीचा निधी खर्च झालाय.. सिंचन घोटाळ्याचे सत्य पुढे आलेच पाहिजे'

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील पाणी प्रश्नांबाबत काय उपाययोजना करण्यात येतील, याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्याचा आमचा मानस आहे. तसेच नाशिक, जळगाव जिल्ह्याचा पाणी प्रश्नही सोडवला जाईल, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री आणि खात्याचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्याकडून दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प, या आंतरराज्य नदीजोड योजनांबाबत आढावा घेण्यात आला.

हेही वाचा... भाजप मनसे एकत्र येवू शकतात - प्रवीण दरेकर

'आज शनिवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. नाशिकमधुन पश्चिमेकडे जाणारे पाणी पुर्वेकडे घेऊन जाण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना कशा करता येईल.' त्याबाबत आढावा घेण्यात आला असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.

हेही वाचा... 'मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, आता त्यांचा गोंधळ उडालाय'

'मराठवाड्याला पाणी कसे पुरवता येईल, तसेच पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्यासाठी १९८० सालापासून पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे आणण्यासाठी विचार चालू आहे. या बैठकीला स्वत: शरद पवार होते. त्यांनी देखील मार्गदर्शन केले आणि काही सुचना केल्या. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कसे सुखी करता येईल. याचा आम्ही विचार केला आहे', असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह आणि शरद पवार यांच्या भेटीबाबात त्यांना विचारले असता, पाटील यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:mh_mum_Jayant_patil_irrigation_meet_mumbai_7204684

पश्चिमेकडून जाणारे पाणी पूर्वेला वळवणार : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

मुंबई: महाराष्ट्राचा दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमेकडून जाणारे पाणी पूर्वेला कसे वळवता येईल याबाबत आज जलसंपदा विभागाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.यासाठी काय उपाययोजना करता येईल, कशी गती देता येईल याबाबत चर्चा झाली. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी विषय समजून घेत काही सुचनाही केल्या.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने येत्या काळात नक्कीच या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल.राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री आणि त्या खात्याचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्याकडून दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प ह्या आंतरराज्य नदीजोड योजनांबाबत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथील बैठकीत सविस्तर माहिती घेतली. शरद पवारांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मराठवाड्यातील पाणी प्रश्नांबाबत महत्त्वाची बैठक झाली.जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्याचा आमचा मानस आहे.नाशिक, जळगाव जिल्ह्यांचा पाणी प्रश्नही सोडवला जाईल.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती.नाशिक मधुन पश्चिमेकडे जाणारे पाणी पुर्वेकडे घेऊन जाण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना कश्या करता येईल त्याबाबत आढावा घेण्यात आला आहे.

मराठवाड्याला पाणी कसे पुरवता येईल याबाबत बैठक घेण्यात आली. पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्यासाठी १९८० सालापासून पश्चिम वाहीनी पाणी पुर्वेकडे आणण्यासाठी विचार चालू आहे.
या बैठकीला स्वत: शरद पवार होते त्यांनी देखील मार्गदर्शन केले आणि त्यांच्या काही सुचना होत्या त्या देखील त्यांनी केल्या असं त्यांनी सांगितलं.

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कसे सुखी करता येईल याचा आम्ही विचार केला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाचलुचपत विभागाचे महासंचालक परमबीर सिंह आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले, कोण कोणाला भेटले हे मला माहीत नाही.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.