ETV Bharat / city

Maharashtra Unlock : आरोग्य मंत्री टोपे म्हणाले - 'या' महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता

author img

By

Published : Feb 9, 2022, 9:28 PM IST

Updated : Feb 9, 2022, 9:33 PM IST

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्यामुळे आता कोविड निर्बंध शिथील करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

Maharashtra unlocked in last week of February - Rajesh Tope
आरोग्य मंत्री टोपे

मुंबई - कोरोनाचा ( Corona ) प्रादुर्भाव आता कमी होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्बंध पूर्णत: शिथील करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) म्हणाले. नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार विचार करत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही शक्यता वर्तवली.

कोरोना रुग्णांची संख्या राज्यभरात कमी होत असल्याने नाट्यगृह, सिनेमागृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात संबंधीतांकडून मागणी होत आहे. त्यामुळे अनलॉक संदर्भात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 7 हजार नवे रुग्ण; 92 जणांचा मृत्यू

Last Updated : Feb 9, 2022, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.