ETV Bharat / city

Sanjay Raut : महाराष्ट्र कमजोर होतोय! संजय राऊतांचे 'ते' भाकीत पुन्हा व्हायरल

author img

By

Published : Oct 10, 2022, 7:22 AM IST

निवडणूक आयोगाने ( Election Commission) शिवसेनेचा चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया ( Angry reaction of Shiv Sainiks ) उमटत आहेत. शिवसेनेचे चिन्ह गोठल्यानंतर राऊतांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. राऊतांच्या या भविष्यवाणीची सोशल मिडीयातही मोठी चर्चा रंगली आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई : निवडणूक आयोगाने ( Election Commission) शिवसेनेचा चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया ( Angry reaction of Shiv Sainiks ) उमटत आहेत. राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोपामध्ये गुंतले ( Political parties indulged in recriminations ) आहेत. दुसरीकडे शिवसेनेची तोफ संजय राऊत यांना अटक ( Sanjay Raut arrested ) झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे असे भाकित केले होते. आज शिवसेनेचे चिन्ह गोठल्यानंतर राऊतांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. राऊतांच्या या भविष्यवाणीची सोशल मिडीयातही मोठी चर्चा रंगली आहे.


संजय राऊत न्यायालयीन कोठडीत : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या मदतीने सुरत व्हाया गोवाहाटी मध्ये जाऊन बंड केला. शिवसेनेत या बंडखोरीने दोन गट पडले. फुटीर शिंदे गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला. संजय राऊतांनी यानंतर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांवर घणाघात चढवला होता. संजय राऊतांच्या आक्रमकतेने राज्यातील शिवसैनिक चवताळून उठला होता. अखेर कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने संजय राऊत यांना अटक करताच शिंदे गटाच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे, असे विधान केले होते.

संजय राऊत


प्रादेशिक पक्षाला संपवल्याचा शिंदे गटावर ठपका : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 ला शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेला ओळख म्हणून वाघ चिन्ह तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे चिन्ह गोठवले. राज्यात यामुळे संताप व्यक्त केला जातो आहे. एका प्रादेशिक पक्षाला संपवल्याचा शिंदे गटावर ठपका सोशल मीडियातून ठेवण्यात आला आहे. तसेत जोरदार टीकास्त्र सुरु आहेत. अशातच संजय राऊत यांच्या महाराष्ट्र कमजोर होतोय, हे भाकित करणारे विधान जोरदार व्हायरल झाला आहे. अनेकांनी संजय राऊतांनी वर्तवलेल्या भाकितांवरून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधताना दिसत आहेत. ज्येष्ठ नेत्यांना डावलणारा भाजप पक्ष आगामी काळात शिंदेंना किती सहकार्य करेल, असा प्रश्न ही सोशल मीडियातून विचारला जातो आहे.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.