ETV Bharat / city

Breking News Live : स्वच्छ सर्वेक्षणमध्ये साताऱ्याचा डंका, पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर, तर कराडला तृतीय क्रमांक

author img

By

Published : Oct 1, 2022, 6:42 AM IST

Updated : Oct 1, 2022, 10:38 PM IST

maharashtra breaking
महाराष्ट्र ब्रेकिंग

22:37 October 01

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये साताऱ्याचा डंका, पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर, तर कराडला तृतीय क्रमांक

‘स्वच्छ सर्वेक्षण' स्पर्धेत सातारा जिल्ह्याने आपली घोडदौड कायम राखली आहे. हिल स्टेशन असलेले पाचगणी देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले असून याच श्रेणीत कराड शहराला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

21:52 October 01

Mumbai Corona Update - १३० नवे रुग्ण, १ मृत्यूची नोंद

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला आहे. आज १३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ७०५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

19:20 October 01

धक्कादायक.. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी एन्काउंटर करण्याची धमकी

परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असून 10 लाखाची खंडणी मागत असल्याचा तसेच एन्काउंटर करण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप माजी शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला आहे.

19:05 October 01

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रुटला गुन्हे शाखेने केली अटक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुटला ६ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात अली आहे. गुन्हे शाखा त्याची चौकशी करणार आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेला छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलीम कुरेशी आणि रियाझ भाटी याच्याविरुद्ध नवीन एफआयआर नोंदवला आहे. याच प्रकरणात आरोपी रियाझ भाटी यालाही अटक करण्यात आली होती.

18:23 October 01

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना सत्र न्यायालयाचा झटका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उकें यांना सत्र न्यायालयाचा झटका

वकील सतीश उकें आणि त्यांचे बंधू प्रदीप उकें यांचा जामीन अर्ज फेटाळला

जमीन खरेदी मध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकारात ईडी कडून करण्यात आली होती अटक

1 एप्रिल रोजी नागपूर मधून 12 तासाच्या चौकशीनंतर करण्यात आली होती अटक

18:23 October 01

साताऱ्यात शॉर्टसर्किटमुळे स्कूल बसने घेतला पेट, पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचले विद्यार्थ्यांचे प्राण

सातारा - विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूल बसने अचानक पेट घेतल्याची घटना सातारा-कोरेगाव रस्त्यावरील खावली गावानजीक घडली. चालत्या स्कूल बसमधून धूर येत असल्याची बाब चालकाच्या लक्षातही आली नव्हती. मात्र, ड्युटीवरून घरी निघालेल्या पोलिसाने प्रसंगावधान दाखवत चालकाला बस थांबवायला लावत क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांना खाली उतरवून त्यांचे प्राण वाचवले.

15:28 October 01

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ते नाशिक मध्ये दाखल झाले, राज ठाकरे हे उद्या सकाळी वणी येथील सप्तशृंगी गडावरील भगवती मातेचे दर्शन घेणार आहे,हा कुठलाही राजकीय दौरा नसला तरी या दरम्यान राज ठाकरे नाशिक महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील असे बोलले जाते,यावेळी राज ठाकरे यांच्या सोबत माजी आमदार बाळा नांदगावकर आणि मनसे पदाधिकारी उपस्थित आहेत..

13:03 October 01

पोलीस कर्मचाऱ्याची स्वत: गोळी झाडून आत्महत्या

अहमदनगर - राहुरी तालुक्यातील मुळा धरणावर सुरक्षा गार्ड म्हणून ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी छाडून घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९ राहणार बारागांव नांदूर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

13:03 October 01

माझं नाव टायगर; शिवसेनेचा दुसरा टिझर रिलीज

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अवघे काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच राज्यात शिवसेना आणि शिंदे गटाकडून गर्दी जमवण्यासाठी टिझरची स्पर्धा सुरू झाली आहे. फुटीर शिंदे गटाच्या दुसऱ्या टिझरमध्ये बाळासाहेबांचे भाषण वापरल्यानंतर शिवसेनेकडून दुसरा टिझर रिलीज केला असून 'माझं नाव काय... टायगर!' अशी सुरुवात करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे 'आम्ही जीवाचे सैनिक वेडे, करू जीवाचे रान', या शिवसेनेच्या सुप्रसिद्ध गाण्याची धून देण्यात आली आहे.

11:34 October 01

पाकिस्तान सरकार ट्विटर बातमी भारतात बंदी

नवी दिल्ली - पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आले (Pakistan Government Twitter AC Withheld) आहे. हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आले (Pakistan Government Twitter AC Block India) आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

11:34 October 01

मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीने महाकाली महोत्सव वादाच्या भोवऱ्यात

चंद्रपूर : चार दिवसीय महाकाली महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांची देखील प्रमुख उपस्थिती या महोत्सवात असणार आहे. त्यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण झाला आहे.

11:33 October 01

मुंबईत पहिल्यांदाच एसी लोकलचा एक डबा सौर उर्जेवर चालणार

मुंबईत पहिल्यांदाच एसी लोकलचा एक डबा सौर उर्जेवर चालणार आहे.

10:10 October 01

शिर्डी विमानतळावर राज ठाकरे यांचे आगमन; सुजय विखेंनी केले स्वागत

र्डी विमानतळावर राज ठाकरे यांचे आगमन; सुजय विखेंनी केले स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर

शिर्डी विमानतळावर राज ठाकरे यांचे आगमन

नगर दक्षिणेचे भाजप खासदार सुजय विखे यांनी केले राज ठाकरे यांचे स्वागत

मी राज ठाकरे यांचा चाहता असल्याने त्यांना भेटण्यासाठी आलोय - सुजय विखे

भाजप आणि मनसेची जवळकी वाढतेय हे मी माध्यमातून एकतोय

भाजप मनसे एकत्र येण्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील - सुजय विखे

शिर्डी विमानतळावरून राज ठाकरे शिर्डीकडे रवाना

साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचे राज ठाकरे सहपत्नीक घेणार दर्शन

08:00 October 01

मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार

मुंबई - उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून ते शिंदे गटात जाणार असल्याचा गौप्यस्फोट करणारी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिली. काही दिवसापूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार आम्हाला येऊन मिळतील आणि शिवसेना शिल्लकसेना राहील; असे सुतोवाच केले होते. त्याला अनुसरून गुलाबराव पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला. आता शिवसैनिकांच्या नजरा नार्वेकरांच्या हालचालीवर असणार एवढे मात्र नक्की.

07:06 October 01

धनुष्यबाणाचे काय होणार? सुप्रिया सुळेंनी दाखवला मार्ग

सातारा : खरी शिवसेना कुणाची, यासंदर्भातील निर्णयाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कोर्टात ( Supreme Court Sent Decision to Election Commission ) टोलवला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवले ( Arrow Symbol Can be Frozen ) जाऊ शकते, या चर्चेच्या अनुषंगाने बोलत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेचा दाखला देत महिनाभरात आम्ही चिन्ह लोकांमध्ये ( Gram Panchayat Elections Reach Mark in Ten Days ) पोहोचवले, निवडून आलो आणि सत्तेतही बसलो, अशी प्रतिक्रिया कराडमधील पत्रकार परिषदेत दिली.

07:06 October 01

दुचाकीवरून आलेल्या दोघांचा कांदिवली परिसरात गोळीबार; एकाचा मृत्यू

मुंबई - कांदिवली पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी काही लोकांवर गोळीबार केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी झोन-11 विशाल ठाकूर यांनी दिली.

06:37 October 01

'शेलार खोटं बोलत आहेत' मयत रमेश वळंजू यांच्या नातेवाईकांचे विधान

मुंबई - मुंबईत झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी रमेश वाळुंज या धाडसी शिवसैनिकाचे उदाहरण दिलं होतं. शिवसेनेच्या या लढवय्या कार्यकर्त्यांनी वांद्रे बँडस्टँड येथील समुद्रात दोन मुली बुडत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी थेट समुद्रात उडी घेतली. या दोन मुलींना वाचवत असताना वाळुंज यांचा मृत्यू झाला. उद्धव ठाकरे यांच्या दाव्यानंतर लगेचच आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना वाळुंज हे शिवसैनिक नाही तर भाजपचे कार्यकर्ते होते असा दावा केला होता. यावर आता खुद्द रमेश वाळुंज यांच्या पत्नीनेच पत्रकार परिषद घेत आशिष शेलार व भाजप खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.

06:37 October 01

बॉलीवूड गायक राहुल जैनची मुंबई उच्च न्यायालयात बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी धाव

मुंबई - बॉलीवूडमधील संगीत दिग्दर्शक आणि गायक राहुल जैन याच्या विरोधात कस्टम डिझायनर महिलेने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गायक राहुल जैनने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 3 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

06:27 October 01

MAHARASHTRA BREAKING NEWS

मुंबई - राज्यात सत्तांतर होताच मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी बदलीचे सत्र सुरू आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सहसचिवाने नव्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा फायदा उठवण्याचा डाव आखला. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास ही लबाडी येताच तात्काळ कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश दिले आहेत.

Last Updated : Oct 1, 2022, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.