ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

author img

By

Published : Aug 10, 2022, 6:44 AM IST

Updated : Aug 10, 2022, 2:08 PM IST

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

14:06 August 10

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

  • Nitish Kumar takes oath as Bihar CM for 8th time, after he announced a new "grand alliance" with Tejashwi Yadav's RJD & other opposition parties pic.twitter.com/btHWJURsul

    — ANI (@ANI) August 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाटणा येथील राजभवनात शपथविधी समारंभात मुख्यमंत्री पदाची शपथ नितीश कुमार यांनी घेतली आहे. या समारंभात आरजेडीचे तेजस्वी यादव आणि त्यांची पत्नी राजश्री, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि आरजेडी नेते तेज प्रताप यादव उपस्थित आहेत.

14:01 August 10

राज्य सरकारांना केंद्राकडून 1,16,665 कोटी रुपये वितरित

केंद्र सरकारने राज्य सरकारांना 1,16,665 कोटी रुपयांचे कर वाटपाचे 2 हप्ते वितरित केले आहेत. राज्यांच्या भांडवली आणि विकास खर्चाला गती देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार असल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

13:59 August 10

शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना संजय राऊतांच्या भेटीची नाकारली परवानगी

न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या भेटीला शिवसेनेचे खासदार आणि आमदार गेले होते मात्र भेटीची परवानगी नाकारली.

ऑर्थर रोड तुरुंग प्रशासनाने नाकारली परवानगी.

कोर्टाच्या परवानगीशिवाय आरोपीला भेटता येत नसल्याने कोर्टाच्या परवानगीसह भेटायला या अश्या जेल प्रशासनाच्या सूचना

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांच्याकडे एक विनंती केली की राऊत यांना त्यांच्या कार्यालयात भेटू द्यावं

मात्र जेल अधीक्षकांनी याला विरोध करत अस भेटता येत नसून इतर कैद्यांना नातेवाईक भेटतात तिथेच भेटा अस सांगितलं

13:58 August 10

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर

आयएनएस विक्रांतशी संबंधित निधीच्या कथित चुकीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या विरोधात अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.

11:05 August 10

कोवॅक्सिन आणि कोविशील्ड बूस्टर देण्यास केंद्राची परवानगी

कोवॅक्सिन आणि कोविशील्ड 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांसाठी बायोलॉजिकल ईचा कॉर्बेवॅक्स बूस्टर शॉट देण्यास भारत सरकारने मंजूर केला आहे:

11:05 August 10

आरजेडी नेते तेजस्वी यादव बिहारचे होणार उपमुख्यमंत्री

आरजेडी नेते तेज प्रताप यादव पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी विजय चिन्ह म्हणून हात दाखविले आहे. नितीश कुमार आज 8व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आरजेडी नेते तेजस्वी यादव हे राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

10:06 August 10

राहुल गांधी यांचा राजस्थानचा दौरा रद्द

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा आजचा राजस्थानमधील अलवर दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आला आहे. तेथे ते पक्षाच्या 'नेत्रत्व संकल्प शिबिर'ला जाणार होते: सूत्रांनी सांगितले

10:05 August 10

सुमारे 25 ते 30 किलो वजनाचा आयईडी पुलावामा येथून जप्त

आज पुलवामा येथील सर्कुलर रोडवरील तहब क्रॉसिंगजवळ सुमारे 25 ते 30 किलो वजनाचा आयईडी पोलीस आणि सुरक्षा दलांनी जप्त केला होता. तो आता निकामी करण्यात आला आहे

09:32 August 10

शिवसेना भाजपनेच फोडली, सुशील मोदींचा दावा

भाजप नेते सुशील मोदी यांनी नितीश कुमार यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजपनेच फोडली, असा त्यांनी दावा केला.

09:17 August 10

प्रियांका गांधी वड्रा यांना कोरोनाची लागण

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांची #COVID19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट, "घरी एकटे राहतील"

09:15 August 10

मंत्रिमंडळानंतर एकनाथ शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ होणार

मंत्रीमंडळांनतर विस्तारानंतर एकनाथ शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज उशिरा होणार आहे.

08:48 August 10

७ वर्षीय मुलगा उघड्या नाल्यात पडला, शोध सुरू

गुरुग्राम जिल्ह्यातील गडोली गावात रविवार, ७ ऑगस्ट रोजी एक ७ वर्षीय मुलगा उघड्या नाल्यात पडला. आम्ही जवळपास 14-15 किमी क्षेत्र शोधले आहे. सुमारे 48 तासांपूर्वी शोध मोहीम सुरू झाली, परंतु आम्हाला तो सापडला नाही, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे एनडीआरएफ अधिकारी गौरव पटेल, एनडीआरएफ अधिकारी यांनी सांगितले.

08:47 August 10

तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाचा घेराव

बडगामच्या वॉटरहेल भागात चकमक सुरू आहे. दहशतवादी संघटना LeT (TRF) च्या तीन दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. यात दहशतवादी लतीफ रादर यांचा समावेश आहे. हा राहुल भट आणि अमरीन भट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्यांमध्ये सामील होता.

07:50 August 10

इसिसशी संबंध असलेल्या दहशतवाद्याला युपी एटीएसकडून अटक

यूपी एटीएसने स्वातंत्र्यदिनी हल्ल्याची योजना आखणाऱ्या इसिसशी संबंध असलेल्या दहशतवाद्याला युपी एटीएसने अटक केली.

07:00 August 10

मुंबईत बसने धडक दिल्याने चार जण जखमी

  • #WATCH | Mumbai: Four people were injured after a bus hit them. The accident took place due to brake failure of the bus which was going from Santosh Nagar to Kurla. Dindoshi police has registered a case and started further investigation.

    (CCTV Visuals) pic.twitter.com/OKMMUpqPrO

    — ANI (@ANI) August 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बसने धडक दिल्याने चार जण जखमी झाले. संतोष नगरहून कुर्ल्याकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

06:53 August 10

बडगामच्या वॉटरहेल सुरक्षा दल व दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू

बडगामच्या वॉटरहेल भागात चकमक झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे.

06:52 August 10

भारत-बांगलादेश सीमा भागात सुरक्षा व्यवस्था कडक

स्वातंत्र्य दिनापूर्वी भारत-बांगलादेश सीमा भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

06:52 August 10

जागतिक स्तरावर दहशतवादी धोके वाढत आहेत-रुचिरा कंबोज

दहशतवाद्यांशी व्यवहार करताना दुटप्पीपणा नसावा. जागतिक स्तरावर दहशतवादी धोके वाढत आहेत, असे UNSC मधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी म्हटले. त्या दहशतवादी कृत्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका" या विषयावर UNSC ब्रीफिंगमध्ये बोलत होत्या.

06:47 August 10

केरळमधील आयोगाची परीक्षा मुलासह आईही पास

मलप्पुरम येथील 42 वर्षीय आई आणि तिचा 24 वर्षांचा मुलगा यांनी मिळून लोकसेवा आयोगाची (PSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

"आम्ही एकत्र कोचिंग क्लासला जायचो. माझ्या आईने मला या ठिकाणी आणले. माझ्या वडिलांनी आमच्यासाठी सर्व सुविधांची व्यवस्था केली. आम्हाला आमच्या शिक्षकांकडून खूप प्रेरणा मिळाली. आम्ही दोघांनी एकत्र शिकलो. पण आम्ही एकत्र पात्र होऊ असे कधीच वाटले नव्हते. आम्ही आहोत. दोघेही खूप आनंदी आहेत, असे बिंदू यांचा मुलगा विवेक म्हणाला

06:27 August 10

Maharashtra Breaking News : नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

मुंबई- राज्य मंत्रिमंडाळाचा 39 दिवसांपासून लांबलेला विस्तार अखेर मंगळवारी सकाळी राजभवनात पार पडला. त्यात भाजपा व शिंदे गटाचे ( BJP and Shinde group ) प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांना मंत्रिपदाची ( 18 MLAs sworn as ministers ) संधी मिळाली आहे. 39 दिवसानंतर राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने आपला पहिला मंत्रिमंडळ विस्तार ( Maharashtra Cabinet Expansion 2022 ) केला आहे. आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ( first cabinet expansion of CM Shinde ) भारतीय जनता पक्षाकडून 9 तर एकदाच शिंदे गटाकडून 9 असे एकूण 18 मंत्र्यांना मंत्रिपदाची जबाबदारी ( ministerial responsibility in Shindes cabinet ) देण्यात आली आहे. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कोणत्या आमदाराला कोणते खाते मिळणार ( ministerial account allocation in Shinde cabinet ) , यासाठी लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Last Updated :Aug 10, 2022, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.